Wednesday 14 December 2011

साद देती हिमशिखरे

....आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच पुन्हा जीपने निघालो. कालच्या वाटेनेच जीप जात होती. मक्कूमठापाशी गाडी थांबली. आता यापुढील रस्ता पायी असे ठरले. काल भेट दिलेल्या मार्कंडेय मंदिरापासून साधारणपणे अर्धा किमी चालल्यावर एका डोंगराकडे बोट दाखवत सेमवाल म्हणाले, त्या तिथे ते राहतात.

<span title=उखांमठापाशी भेटलेले लोक पान ३"

Figure 5 मक्कूमठापाशी डोंगरावरील मैठाणींच्या घराच्या छतावर गढवाली भाषेत चर्चा रंगली.

धापा टाकत आम्ही डोंगरावर पोचलो. बऱ्याच वर्षांनी भेटी होत असल्याने आमची गरमागरम भात व डाळींच्या उसळीने आव-भगत झाली. अत्यंत थंडी व चढून आल्यामुळे चवीकडे लक्ष होते कोणाचे? जेवणानंतर कळले की तुंगनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शिवमंदिराचे ८६ वर्षाचे वृद्ध पुजारी महेशानंदजी, शिव-पार्वती व गणांची पालखी खांद्यावर घेऊन गावात मिरवायला व दर्शनाला घेऊन गेले आहेत व साधारण महिन्याभराने परततील.

त्यांच्या घरातील सर्वजण अतिशय काटक व बळकट होते. पैकी त्यातील एक ७६ वर्षाचे धाकटे भाऊ आर्मीत होते. मी हवाईदलातील अधिकारी असल्याचे ऐकून त्यांनी मला कडक सॅल्यूट ठोकला. त्यांच्याकडील भृगुसंहितेचा ग्रंथ दाखवला. मेरठ छापखान्यातील ती संहितेची पाने मला पूर्वपरिचित होती. याशिवाय काही भूर्जपत्रे आहेत का? या प्रश्नाचे त्यांच्याकडे नक्की उत्तर नव्हते. कदाचित असतील म्हणाले. त्यांना मुलेबाळे होती, पण सध्या कोणी हयात नव्हती. नंतर आम्ही परतलो. रात्री रोजच्याप्रमाणे बाबांना फोनवरून अहवाल सांगितला.नाथसंप्रदायात परीक्षा कडक असते. आदेश झाला आहे तेवढेच व तेच कार्य करायचे. एका यात्रेत सर्व साध्य कसे होणार? आपण सुरवात केलीत. आता पुढील आदेश काय मिळतो ते पाहू. परतलात तरी चालेल,’ बाबांचा आदेश झाला.

त्या रात्री सेमवालजींच्या घरात घडत असलेल्या सत्यसाईंच्या अदभूत लीलांच्या कथा व भजनांत आम्ही रात्र जागवली. निघण्याआधी थंडीमुळे केदारनाथ मंदिरातील उखीमठाच्या मंदिरात ठेवलेल्या शिवजींच्या मुखवट्यांचे दर्शन घेतले.

ukhi

Figure 6 उखीमठमधील दाक्षिणात्य शैलीचे शिवमंदिर


तेथील पुजारी कर्नाटकातील विजापूरचे असल्याने चकीत व्हायला झाले. त्या मंदिराचा जीर्णोद्धार महासती अहिल्याबाई होळकरांनी केला. त्या वेळेपासून पौरोहित्य करण्यासाठी त्यांनी मराठी लोकांना प्राध्यान्य दिले. त्याचे फळ म्हणजे परंपरागत कानडी मुलुखातील मराठी पुजारी तेथे आजही आहेत. ते मराठी बोलत नाहीत पण त्यांना मराठी असण्याचा अभिमान जरूर आहे.

<span title=ऋषिकेशच्या गगा स्नानाला जाताना" border="0" height="376" width="576">

Figure 7 ऋषिकेशच्या गंगाकिनारी स्नानाच्या तयारीत



संक्रांतला ऋषिकेशच्या किनारी गंगेत स्नान करून मी परतलो. पुढे जुलै २००३ मधे निवृत्त झालो. विविध मार्गांनी माझ्याकडे नाडीमहर्षींच्या ग्रंथपट्ट्यांचे आगमन झाले. चितळे बाबांच्या पुढील आदेशाची आता वाट पाहात आहे.

No comments:

Post a Comment