Wednesday 7 March 2012

चितळेबाबांच्या घरच्या पुजा रुममधे बाबा सांगतात जालंधरबंध कसा घालावा याचे प्रात्यक्षिक मिलिंद चौबळ यांनी करताना नाथांची मुर्ती

चितळेबाबांच्या घरच्या पुजा रुममधे  बाबा सांगतात जालंधरबंध कसा घालावा याचे 
प्रात्यक्षिक मिलिंद चौबळ यांनी करताना

चितळेबाबांच्या घरच्या पुजा रुममधील बाबा जालंधर नाथांची मुर्ती

चितळेबाबांच्या घरच्या पुजा रुममधील बाबा जालंधर नाथांची तेजस्वी मुर्तीचे दर्शन

Monday 5 March 2012

मंगलाताई ओक सांगतायत आपला पुज्य चितळेबाबांविषयीचा अनुभव.

मंगलाताई ओक सांगतायत आपला पुज्य चितळेबाबांविषयीचा अनुभव.

शब्दांकन  - शशिकांत ओक. 
त्याचे असे झाले की माझी आई घसरून पडल्याचे निमित्त झाले आणि मिलिटरी हॉस्पिटलमधे शस्त्रक्रिया झाल्यावर एकाएकी घसा बसून तिला बोलताना त्रास व्हायला लागला. आवाज उमटेना. कथा-कीर्तने, प्रवचने करणारी, गायनात प्रवीण माझी आई या धक्क्याने फार चिंतेत पडली. काही इलाज करून फरक पडेना. त्यावेळी बाबांशी सल्ला-मसलत करून त्यांनी सुचवलेला उपाय केला.  तो असा होता – सुवर्णभस्मात काही अन्य द्रव्य घालून त्याच्या लहान लहाल गोळ्याकरून त्या घ्यायच्या होत्या. उपाय थोडा खर्चिक होता, तरीही आईने त्या गोळ्या बाबांच्या सांगण्यावरून घेतल्या. पुढे काही दिवसात त्याच्या प्रभाव पडून तिची वाचा परत आली. ती नीट बोलयला, गायला लागली. व आता पुर्णपणे बरी आहे.  
नुकताच टीव्हीवरील एक कार्यक्रम पहाताना त्यात सुवर्णभस्माची महती सांगितली जात होती, त्यावेळी आईला पुज्य चितळेबाबांनी तिला दिलेल्या सुवर्णभस्माच्या चुर्णाच्या गोळ्यांची आठवण झाली व बाबांवरील साधकांचे अनुभव ब्लॉगवर तिने तिला आलेल्या प्रचितीची नोंद मला आवर्जून करायला सांगितले.