Thursday 27 July 2017

ज्ञान सागरातील मोती - श्रीपाद श्रीवल्लभ लीला वैभव ग्रंथातून...


ज्ञान सागरातील मोती
कथनातून विविध विषयांची माहिती व उपदेश
प्रश्न - "दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा " या नामजपाचा अर्थ काय
(अ. 16 पान 148)
उत्तर : दिगंबर म्हणजे वस्त्रहीन हा अर्थ इथे अभिप्रेत नाही. दिक् म्हणजे दिशा किंवा सीमा. ८ दिशांना आपण आकाशाच्या सीमा मानतो. इथे अशा सीमा नसलेल्या अंबराचे सर्वत्र व्यापलेले तत्व असलेल्या जगतगुरूंचे आपण त्रिवार उच्चारण करतो.

... 
प्रश्न : मानवी बुद्धिचे तत्व काय? ती किती प्रकारची असते? ( अ. 16 पान 143
उत्तर : श्रीपादवल्लभ म्हणाले, 'मानवाच्या बुद्धी विकासानुसार त्याच्या जीवनाचे सार्थक होते. ही सात प्रकारची असते.
१. जिज्ञासा किंवा पंड बुद्धी : विषय लक्षात घेऊन वा ऐकून त्यावर गप्प न बसता त्या विषयाचे तत्व पूर्णपणे जाणण्याचा प्रयत्न करणार्‍या बुद्धीला पंड किंवा संकल्प बुद्धी देखील म्हणतात. यात त्या विषयाबद्दल तळमळ आणि आसक्ती लागते.
२. मेधा : काही लोक ऐकलेले जसेच्या तसे ग्रहण करून स्मरणात ठेवतात. हिला स्मरण शक्ति असे म्हणतात. मेधाशक्तीचे सामर्थ्य चेहर्‍यावरील तेजाने स्पष्ट दिसते. विश्वा​तील​कल्याणासाठी महान कार्ये घडतात. त्यामुळे किर्ती, प्रतिष्ठा, प्राप्ती होते.
३. चार्वि : कल्पना करण्याच्या निपुणतेला चार्वि बुद्धी म्हणतात. आधुनिक वैज्ञानिक शोध, विभिन्न वाङ्मय प्रकारे कार्य यातून घडते. अहंकारामुळे, दुरुपयोग करून पतनास ही कारणीभूत होते.
४. चत्व : विषयावरील तपशील जाणून, ऐकून घेण्याची उत्सुकता, असलेली चिकाटी बाळगणारी बुद्धी. ज्यांना चिकाटी नसते ते सुरवातीला सांगितलेले ऐकून विचारात पडतात. नंतर शेवटचा शब्द ऐकून दचकून विचाराच्या बाहेर येतात. स्वतः विचारात पडल्याने गुरूंनी काय सांगितले ते ऐकूच आलेले नसते. मग आजुबाजुला शिष्यांना विचारतात. 
५. गृहीति : गृहीति म्हणजे ग्रहण बुद्धी. यात ऐकलेल्या मुद्दयांचे ग्रहण करणे व त्या विषयात आपली भावना जोडून यथार्थ समजणे. यात शास्त्र वाक्ये चांगली अवगत होतात. अशा व्यक्ती समाजाचे, देशाचे भले करतात. 
६. श्रौति: गुरूची सेवा करताना सहनशीलता बाळगणारी बुद्धी. ही समोरच्याला जोडणारी सहनबुद्धी आहे. संपत्ति, विद्या, उच्चपद सहनशक्ती कमी पडल्यामुळे व्यर्थ जाते.
७. प्रतिभा : वरील सहा भागांच्या प्रकाशालाच प्रतिभा म्हणतात. वाक्चातुर्य, सत्यवचन ऐकणाऱ्याला शंका होण्याची संधी न देता विषयाबाबत सोदाहरण सांगण्याच्या बुद्धीला प्रतिभावंत म्हणतात. 
.... 
प्रश्न  : "निरंतर स्मरण करणाऱ्यांचा योगक्षेम मी पाहतो". असे गीताचार्यांचे अर्जुनाला निमित्तकरून  भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे. पण जीवनाच्या अनंत गरजांच्या गराड्यतात क्षणोक्षणी चिंतनाचे विषय बदलात. त्यात भगवत चिंतनाचे संकल्प हवेत विरून जातात. नुसतेच निरंतर चिंतन करत  राहिले तर अन्य कार्य कसे करायचे (अ.21 पान 179)
उत्तर : आपल्या मनाला दोन कामे करायची शक्ती आहे. उदाहरणाने पटकन लक्षात येईल. तुम्हाला  लग्नासाठी जायचे आहे. त्यावर विचार करत तुम्ही स्नानाला जाता. परत येऊन पाहता तर एक दागिना जागेवर दिसत नाही. शोधाशोध करूनही सापडत नाही. निराश होऊन चालणार नसते. लग्नाला तर वेळेत जायचे आहे. दागिना नंतर सावकाश शोधू. म्हणून लगेच लग्नाला पोहोचता. पण रस्त्यात, तुमचे मन कशाचा विचार करत होते? लग्नात सर्वांशी बोलता, सगळीकडे गडबडीने फिरताना, वधुवरांचे अभिनंदन करताना, नजरेने इकडे तिकडे पहाताना, कानांनी इतरांचे बोलणे ऐकताना, मनात मात्र दागिन्याचा विचार चाललेला असतो. मनात विचारांचे काहूर उठते. शोधून मिळाला तर खूप आनंद आणि नाही मिळाला तर अपार दु:ख. यावरून हे समजते की आपल्या मनाला दोन प्रकारची शक्ती असते. ज्यामुळे एका विषयावर विचार करीतच समोरची कामे सुद्धा सांभाळता येतात. दागिन्यांविषयी चिंता करीत असताना सुद्धा लग्न समारंभात सर्वांशी सुरळीत व्यवहार चाललेला असतो. मन दोन्ही कार्ये करीत असल्याचे यावरून कळते. किंमती वस्तु न दिसल्यामुळे मन त्याचे सतत चिंतन करत राहते. म्हणजे मनाला अनन्य चिंतन माहिती असल्याचे दिसते.
भगवंत रूपी अमूल्य वस्तूचे भौतिक दागिन्याबाबतच्या चिंतनासारखेच चिंतन करू शकलात तर अनन्य चिंतन होऊ शकते. दागिन्यांचे चिंतन केले तर तो दागिना मिळेल किंवा मिळणार नाही. परमेश्वराचे चिंतन करू शकल्यास तुम्ही गमावलेल्या ज्ञानासह बाह्य संपदा आदि तुम्हाला जितके द्यायचे तितके भगवंत सोय करून देतो व  दिलेल्याचे सदासर्वकाळ कवचासारखे उभे राहून रक्षण करतो. असे हे वचन आहे. याचा शोध करून सफल व्हा. हीच मानवजन्माची सार्थकता! अशा प्रकारे श्रीपादवल्लभांनी  उपस्थितांना बोध केला. 
.... 
प्रश्न : गुरूसेवा किती प्रकारे केली जाते
(अ.22 पान 183)
उत्तर : गुरूची सेवा चार प्रकारे केली जाते.
१. स्थान शुश्रूषा - आश्रम स्वच्छता.
२. अंग    शुश्रूषा - स्व शरीर पवित्र ठेवून गुरूच्या देहाची सेवा.
३. भाव. शुश्रूषा - गुरूच माता-पिता अशा परमेश्वरीय भावनेने सेवा करणे.
४. आत्म शुश्रूषा - गुरूंचा भाव जाणून वागणे.

प्रश्न : आपण सदशिष्याची लक्षणे विषद करावी. (अ.22 पान 183)
उत्तर : आता सदशिष्याची नऊ लक्षणे सांगतो.
१. अहंकार रहित, सन्मानापासून दूर राहणे.
२. निर्मत्सरत्व, मत्सररहीत असणे.
३. दक्षता, आळस नसणे.
४. निर्ममत्व. ममकाररहित.
५. गुरुसेवा परायणत्व.
६. निश्चलत्व, चंचलता नसणे.
७. परमार्थ जिज्ञासा.
८. अनसूयत्व, असूया रहित राहणे.
९. पवित्र सत्य भाषण.
... 

Thursday 13 July 2017

अध्याय 6 नरसावधानींचा वृतांत

अ.         6 श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता
नरसावधानींचा वृतांत
अ.
पान
चर्चा कोणाकोणात होत आहे?
स्थळांचा उल्लेख नकाशा संदर्भ व उपलब्ध फोटोसाठी नावावर क्लिक करा
कथाभाग
श्रींचे वय/
प्रवासाचे अंतर
कि. मी.
नकाशा दर्शन
6
39
तिरुमलदास पुढे शंकर व माधव यांना श्रींच्या आठवणी सांगतात.
पीठापुरचे कुकुटेश्वर मंदिरà
एकदा श्रींच्या समोर एका योग्याने प्रत्येक माणसाला व देवीदेवतांच्या मूर्तींना प्रभावलय असते ते मी पाहू शकतो. म्हणून पीठापुरतील कुकुटेश्वराच्या मुर्तीचे प्रभावलय व त्यातील रंगछटा पहायला लागला. तिथे त्यांना श्रींची प्रभावळीत निळ्यारंगातून प्रेम व करुणाभाव जाणवला. प्रभावळीच्या रंगभेदांवरून जन्मसिद्ध चातुर्वर्ण्याच्या व्यक्तींचा शोध घेता येईल का?  चतुर्वर्ण व्यवस्था कशी निर्माण झाली? अन्य वर्णाच्या लोकांनी उपनयन करावे का? यावर खल होऊ लागला. तेंव्हा श्रींनी म्हटले दुसऱ्याचे प्रभावलय पहायच्या मूर्ख प्रयत्नात व अन्य चर्चात जीवनाचा वेळ व्यर्थ घालवू नका असे सुनावले! नियमनिष्ठेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र समान आहेत. नियमनिष्ठेने आचरण असेल तर त्यांचेही उपनयन करता येईल. ज्ञान सिद्धी मिळवण्यासाठी जाती, वर्ण, कुल, लिंग, वय अशी कुठलीही आडकाठी नसते. अशा चर्चा, वादावादीत निष्णात नरसावधानी नामक बगलामुखीचे उपासक मोडता घालत.

अ.  पान 40 Kukuteshwar मंदीर.jpg 
       कुकुटेश्वर मंदीर

41
पुढील कथानकातून बापन्ना अवधानी मल्लादि गाव सोडून कसे आले?













गंगाधरसुताला गुरूचरित्र कथन करणारे सिद्ध हे तर ते नव्हेत?  

श्रींच्या आईचे वडील बापन्नांना अवधानी जाणकार ज्योतिषी व यज्ञ करण्यात तज्ज्ञ होते. त्यांच्या यज्ञाने पाऊस पडला.  पीठिकापुरातील प्रतिष्ठित नरसिंह वर्मांची गाय जवळच्या शामलांबापुरम (सामर्लकोटा) गावातील खाटिकाकडून सोडवली गेली म्हणून सर्वांच्या आग्रहाने ते पीठिकापुरात वास्तवाला आले. शेती करत घरदार करून राहू लागले. त्यांची कीर्ती व प्रतिष्ठा दूरवर पसरली. 
त्यांना वेंकावधीनी मुलगा व सुमती नामक मुलगी होती. डौलदार व्यक्तिमत्वामुळे तिला सुमती महाराणी म्हणत. गोदावरी प्रदेशात ऐनविल्ली गावात घंटिगोडा आडनावाचा, अप्पल लक्ष्मीनरसिंह राजशर्मा नामक, भारद्वाज गोत्रीय तरूण राहात असे. पुजा करताना त्याला पीठिकापुरातील बापन्ना अवधानींकडे वेदविद्या शिकायला जायचा आदेश मिळाला. बापन्नांनी त्याला ठेवून घेतला. कालांतराने त्याचा सुमतीराणीशी विवाह झाला. पुढे दोन पुत्र झाले. पण मोठा जन्मजात आंधळा व दुसरा पंगू होता. नंतरच्या वेळी विविध दृष्टांतातून दत्तप्रभू जन्माला येतील असे संकेत मिळत गेले. 



तिथे आशुतोष नामक तरुणाने नाडीग्रंथ वाचून सूचित केले की गणेश चतुर्थीच्या उष:काली सिंह गगनात, चित्रा नक्षत्रावर तूला राशीत जन्मलेले बालक दत्तावतारी असेल. ती भविष्यवाणी नंतर खरी ठरून त्याला श्रींच्या आज्ञेने नेल्लूर भागातील पेंचलकोना जवळील कण्व तपोवनात जायला सांगितले. कालांतराने महाराष्ट्रात कण्व मुनींच्या वाजसेनीय शाखेतील माझ्या अवतारात तू पट्टशिष्य होऊन माझ्या अद्भूत लीला प्रत्यक्ष अनुभवशील! असा आशीर्वाद त्यांना मिळाला.
82 किमी.


















577 किमी.

अ 6 पान 40 ऐनविल्ली ते पीठापुरम.PNG
अ 6 पान 44 पेंचलकोना आषुतोषला बगलांबिकेचे दर्शन.PNG

                                                           
6
45
तिरुमलदास शंकरभट्टला सांगतात
श्रीपादांच्या बाललीला

माझी मल्लद्रिपुरापासूनची जुनी ओळख असल्याने मी बापन्नाच्या व राजशर्मांच्या घरचे कपडे धूत असे. कारणवश मला नरसावधानींचे कपडे धुवायला लागत पण मला ते आवडत नसे. एकदा मुद्दाम नाटक करून माझ्यावर त्यांनी आरोप करून शिक्षा मिळावी म्हणून गाऱ्हाणे नेले, पण माझी निरपराध म्हणून सुटका झाली. नंतरच्या कथाभागात श्रींनी दरिद्री नरसावधीना पुढील जन्मी दरिद्री ब्राह्मणाच्या घरातील तुझ्या अंगणातील भाजी खाईन व पुरलेले धन देईन, वांझ गाईच्या दुधातून तिला पुढील जन्मी मुक्ती देईन, तांत्रिकांला ब्रह्मराक्षसाच्यारुपात मृत करून अनुग्रह करीन म्हणून आश्वासन दिले.
श्रीपाद मला भेटायला धोबीघाटावर येत, म्हणून मी त्यांना विनंती केली की आपण ब्राह्मण आहात आपल्याला असे गल्ली बोळातील वस्तीत येणे शोभा देत नाही. त्यावर श्री म्हणाले, अरे त्या नीच नरसावधानीं ब्राह्मणापेक्षा तू ब्रह्मज्ञानासाठी तळमळणाऱा रजक कुलातील जन्मधारी उत्तम ब्राह्मण तूच आहेस. माझ्या भ्रूमध्यात हस्त ठेवून त्यांनी शक्तीपात केला. माझी कुंडलिनीशक्ती जागृत झाली.

Statue Shripad.jpg

बालयोगी रूपातील श्रींचा पीठापुरातील दर्शन

49
पुढील कथा भाग उद्या बोलू म्हणून थांबले.
नरसावधानींचे नीच पुर्वचरित्र
पहिल्या पाढदिवसाच्या दिवशी श्रींनी  बापन्नांना आठवण करून दिली की पुर्व जन्मीचे आपण सत्य ऋषी आहात. श्री शैल्य व गोकर्णातील अनिष्ट शक्तींचा नाश करून मला ती अधिक शक्तीशाली करायची आहेत. मी 16 वर्षापर्यंत आपल्या घरी राहीन.
1वर्ष
Samalkpt temple.jpg
सामलकोटच्या कुकुटेश्वर मंदिराचा परिसर

45
श्रीपादवल्ल्भांची जन्म कुंडली
दि 17 ऑगस्ट 1320 गणेशचतुर्थीला जन्म उषकाली सिंह लग्नात चित्रानक्षत्रावर
कुंडली अ. 6 पान 45 श्रपदवल्लभ 17 Aug 1320.PNG
अ.4 पान 27 वर 23 मे 1336 हा दिवस तिरुमलदास म्हणतात की शुभयोगांनी युक्त  अति उत्तम आहे. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा ही विनंती.
 25 May 1336 Horoscope  अ 4 पान 23.PNG

Monday 3 July 2017

ग्रंथ रचनाकार शंकर भट्ट


ग्रंथ रचनाकार शंकर भट्ट - यांची कथा
व्यक्तीचे / स्थलाचे नाव
अध्याय व पान संदर्भ
कथा  पुर्वचरित्र
नंतरचा  संदर्भ
शंकर भट्ट मूल संस्कृत ग्रंथ रचयिता
प्रस्तावना VI
कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मण, उडुपी गेले असता तेथून कन्याकुमारी मंदिरात कुरवपुरास जा असा आदेश मिळाला. म्हणून ते शोधात निघाले. 
अतिशयोक्त व अनावश्यक वर्णन नाही. पारायणानंतर अन्नदान करून इच्छित फळ मिळवावे.
मल्लादी गोविंद दीक्षित भीमावरम
अक्षर सत्य ग्रंथ
बापन्ना चार्यलुयांच्या पिढीतील 33वे वंशज
चरित्राची तेलुगु प्रत उपलब्ध परंतु ती प्रकाशित करावी याबद्दल संभ्रम. नव्या प्रतीस सन 2001 विजयादशमीस पीठापूरच्या संस्थानाला अर्पण.
काही संकेतातून ती प्रकाशित करावी असे आदेश आल्याचे जाणवून जीर्णावस्थेतील मुळ प्रतीवरून नवी प्रत बनवून जुनी प्रत विजयवाड्या जवळ कृष्णा नदीत विसर्जित.
श्री हरिभाऊ जोशी निटूरकर (भाऊ महाराज)
.VI
मराठी अनुवादक
पत्ता -  2-17-119 एस बी एच कॉलनी उप्पल हैदराबाद. ग्रंथ निर्मिती दि. 1.3. 2007
पीठापुरम
V श्रीपादांचे 16 वर्षे वास्तव्य
पादगया हे नाव गयासुराच्या वधानंतर पडले.
पुरिहूतिका शक्ती-पीठ, कुकुटेश्वर, कुंती माधव मंदिर दक्षिण काशी म्हणून ही प्रसिद्ध
श्रीपाद श्रीवल्लभ
VI
दत्तावतारी,
पुढील अवतार 1. नृसिह सरस्वती. 2. स्वामी समर्थ अक्कल कोट.
श्रीधर शर्मा

(जेष्ठ बंधू)
महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी.
रामराज शर्मा

दुसरे वरिष्ठ बंधू
महाराष्ट्रात श्रीधर स्वामी.  
व्याघ्रेश्वर शर्मा
अ.    1 पान 1
मरुत्व मलै (मृदु मलय?) जंगलात गूहेत भेटलेले तपस्वी. पुर्वाश्रमीचे अत्रेयपुरचे काश्प गोत्रीय मतिमंद ब्राह्मण.पुर्व जन्मात वाघांना मारणारा मल्ल व्याघ्रेश्र्वर म्हणून योगी झाला.
नंतर कुरवपरात वाघावरून गेले असता तेथे वाघाचे कातडे आसन म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांनी स्वीकारले.   
सिद्ध योगिंद्र कथित पांड्य (मदुरै) देशी कदंब वनातील अति जागृत शिव लिंग
अ.   .2 पान 5
सिद्ध योगींनी शंकर भटांना पुन्हा तेच शिव मंदिर पहायला सांगितले. दुसऱ्यादा दिसलेले शिवमंदिर आधीपहिलेल्या शिवमंदिरापेक्षा वेगळे आहे असे वाटते. पहाटे ते सर्व सिद्ध योगिंद्रांसह गुप्त होते.

वल्लभ दास चर्मकार, वैद्य
आ. 2 पा. 8
सर्पाच्या, कावळ्यांच्या, दंशाने घायाळ, गाढवावरून धिंड काढली गेली व नंतर शंकर भट्टांचा इलाज त्यांन केला.
पुर्वाश्रमीचे अहंकारी पंडित व कावळे. श्रींचे आजोबा ज्ञानाच्या अहंकाराने सत्य स्वरूप ओळखू शकले नाहीत. ब्राह्मण असल्याचा गर्व हरण इथे झाला.
विचित्रपुरचा राजा
अ, 2 पा. 10
चिदंबरम जवळ राज्यात मुक भाषेतील व गणिती परीक्षेत यशस्वी झाल्याने सुटका.
युवराजाला जीवन दान व माधव नंबूद्री बरोबर चिदंबरमला पलनीस्वामीचे दर्शन.
तिरुमलदास रजक

सुब्बैया श्रेष्ठी
बंगारप्पा
पुढील जन्मातील बिदरचा राजा
 अ 13
ताडीविक्या ब्राह्मण
 अ 13
उलटे लटकून विहिरीत कोलांट्या खाणारा
अ 15
---

----


----
पुढे गाडगे महाराज म्हणून प्रसिद्ध.


धर्मगुप्त
वेदांत शर्मा
परिव्रजक वृतांत( भास्कर
पंडित)
मराठी बृद्ध व्राह्मण

मालाजंगम वेषात ताडपत्री ग्रंथ ( रमल)
अ 26
अ 36
अ 41

अ 42

अ 4 पान - 28-29
एकच आत्मा 3-4 शरीरातून कर्मफलाचा अनुभव घेऊ शकतो काय ? ...होय
शंकर भट्टाची तरुण स्त्री पासून सुटका. दोन तोतया ब्राह्मण धटिंगणांशी सामना...

विद्यारण्य स्वामी
जॉन नामक व्यक्ती जर्मनीहून कुरवपुरात भेटून जातो

अक्षय कुमार जैन
अ. 8
अ 4

अ. 5 त्रिपुर देशातील व्यक्तीला काही शतकांनी माहिती कळेल.



चिदंबर रहस्यम ?

असूर, राक्षस, पिशाच्च
तीन प्रकारचे चैतन्य एकाच वेळी धारण करणे अ 24
मनाचे काल्पनिक रूप 43


गुरुचरण, धर्मगुप्त यांच्यासमावेत पीठापूरच्या यात्रातील अनुभव
अ 33 ते 46 पर्यंत



पीठपुरला राहणाऱ्या श्रींच्या आई-वडील , आजोबा- आजी आणि अन्य सुहृदांचे कुवरपुरला भेटीला  अवकाश मार्गाने गमन
अ 47 ते 50



श्रींचे गमन
अ 51 ते 53
त्यांनंतर पुढील 3 वर्षे शंकरभट्टांचे कुरवपुरात वास्तव्य ग्रंथ लेखन, 
हे हस्तलिखित पीठापूरला जमिनीत खोल पुरून ठेवायला दिले गेले. साधारण 1987 साली ते पुन्हा आदेशाप्रमाणे बाहेर काढून तेलगू व अन्य भाषात उपलब्ध केले गेले. पीठापुरमला गोपालबाबा नामक विभूतींच्या आश्रमातर्फे ते सध्या माफक किंमतीत उपलब्ध आहे. यातील माहिती हभप निठुरकरांच्या पोथीपेक्षा जास्त सविस्तर आहे असे लक्षांत येते.