Thursday 13 July 2017

अध्याय 6 नरसावधानींचा वृतांत

अ.         6 श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता
नरसावधानींचा वृतांत
अ.
पान
चर्चा कोणाकोणात होत आहे?
स्थळांचा उल्लेख नकाशा संदर्भ व उपलब्ध फोटोसाठी नावावर क्लिक करा
कथाभाग
श्रींचे वय/
प्रवासाचे अंतर
कि. मी.
नकाशा दर्शन
6
39
तिरुमलदास पुढे शंकर व माधव यांना श्रींच्या आठवणी सांगतात.
पीठापुरचे कुकुटेश्वर मंदिरà
एकदा श्रींच्या समोर एका योग्याने प्रत्येक माणसाला व देवीदेवतांच्या मूर्तींना प्रभावलय असते ते मी पाहू शकतो. म्हणून पीठापुरतील कुकुटेश्वराच्या मुर्तीचे प्रभावलय व त्यातील रंगछटा पहायला लागला. तिथे त्यांना श्रींची प्रभावळीत निळ्यारंगातून प्रेम व करुणाभाव जाणवला. प्रभावळीच्या रंगभेदांवरून जन्मसिद्ध चातुर्वर्ण्याच्या व्यक्तींचा शोध घेता येईल का?  चतुर्वर्ण व्यवस्था कशी निर्माण झाली? अन्य वर्णाच्या लोकांनी उपनयन करावे का? यावर खल होऊ लागला. तेंव्हा श्रींनी म्हटले दुसऱ्याचे प्रभावलय पहायच्या मूर्ख प्रयत्नात व अन्य चर्चात जीवनाचा वेळ व्यर्थ घालवू नका असे सुनावले! नियमनिष्ठेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र समान आहेत. नियमनिष्ठेने आचरण असेल तर त्यांचेही उपनयन करता येईल. ज्ञान सिद्धी मिळवण्यासाठी जाती, वर्ण, कुल, लिंग, वय अशी कुठलीही आडकाठी नसते. अशा चर्चा, वादावादीत निष्णात नरसावधानी नामक बगलामुखीचे उपासक मोडता घालत.

अ.  पान 40 Kukuteshwar मंदीर.jpg 
       कुकुटेश्वर मंदीर

41
पुढील कथानकातून बापन्ना अवधानी मल्लादि गाव सोडून कसे आले?













गंगाधरसुताला गुरूचरित्र कथन करणारे सिद्ध हे तर ते नव्हेत?  

श्रींच्या आईचे वडील बापन्नांना अवधानी जाणकार ज्योतिषी व यज्ञ करण्यात तज्ज्ञ होते. त्यांच्या यज्ञाने पाऊस पडला.  पीठिकापुरातील प्रतिष्ठित नरसिंह वर्मांची गाय जवळच्या शामलांबापुरम (सामर्लकोटा) गावातील खाटिकाकडून सोडवली गेली म्हणून सर्वांच्या आग्रहाने ते पीठिकापुरात वास्तवाला आले. शेती करत घरदार करून राहू लागले. त्यांची कीर्ती व प्रतिष्ठा दूरवर पसरली. 
त्यांना वेंकावधीनी मुलगा व सुमती नामक मुलगी होती. डौलदार व्यक्तिमत्वामुळे तिला सुमती महाराणी म्हणत. गोदावरी प्रदेशात ऐनविल्ली गावात घंटिगोडा आडनावाचा, अप्पल लक्ष्मीनरसिंह राजशर्मा नामक, भारद्वाज गोत्रीय तरूण राहात असे. पुजा करताना त्याला पीठिकापुरातील बापन्ना अवधानींकडे वेदविद्या शिकायला जायचा आदेश मिळाला. बापन्नांनी त्याला ठेवून घेतला. कालांतराने त्याचा सुमतीराणीशी विवाह झाला. पुढे दोन पुत्र झाले. पण मोठा जन्मजात आंधळा व दुसरा पंगू होता. नंतरच्या वेळी विविध दृष्टांतातून दत्तप्रभू जन्माला येतील असे संकेत मिळत गेले. 



तिथे आशुतोष नामक तरुणाने नाडीग्रंथ वाचून सूचित केले की गणेश चतुर्थीच्या उष:काली सिंह गगनात, चित्रा नक्षत्रावर तूला राशीत जन्मलेले बालक दत्तावतारी असेल. ती भविष्यवाणी नंतर खरी ठरून त्याला श्रींच्या आज्ञेने नेल्लूर भागातील पेंचलकोना जवळील कण्व तपोवनात जायला सांगितले. कालांतराने महाराष्ट्रात कण्व मुनींच्या वाजसेनीय शाखेतील माझ्या अवतारात तू पट्टशिष्य होऊन माझ्या अद्भूत लीला प्रत्यक्ष अनुभवशील! असा आशीर्वाद त्यांना मिळाला.
82 किमी.


















577 किमी.

अ 6 पान 40 ऐनविल्ली ते पीठापुरम.PNG
अ 6 पान 44 पेंचलकोना आषुतोषला बगलांबिकेचे दर्शन.PNG

                                                           
6
45
तिरुमलदास शंकरभट्टला सांगतात
श्रीपादांच्या बाललीला

माझी मल्लद्रिपुरापासूनची जुनी ओळख असल्याने मी बापन्नाच्या व राजशर्मांच्या घरचे कपडे धूत असे. कारणवश मला नरसावधानींचे कपडे धुवायला लागत पण मला ते आवडत नसे. एकदा मुद्दाम नाटक करून माझ्यावर त्यांनी आरोप करून शिक्षा मिळावी म्हणून गाऱ्हाणे नेले, पण माझी निरपराध म्हणून सुटका झाली. नंतरच्या कथाभागात श्रींनी दरिद्री नरसावधीना पुढील जन्मी दरिद्री ब्राह्मणाच्या घरातील तुझ्या अंगणातील भाजी खाईन व पुरलेले धन देईन, वांझ गाईच्या दुधातून तिला पुढील जन्मी मुक्ती देईन, तांत्रिकांला ब्रह्मराक्षसाच्यारुपात मृत करून अनुग्रह करीन म्हणून आश्वासन दिले.
श्रीपाद मला भेटायला धोबीघाटावर येत, म्हणून मी त्यांना विनंती केली की आपण ब्राह्मण आहात आपल्याला असे गल्ली बोळातील वस्तीत येणे शोभा देत नाही. त्यावर श्री म्हणाले, अरे त्या नीच नरसावधानीं ब्राह्मणापेक्षा तू ब्रह्मज्ञानासाठी तळमळणाऱा रजक कुलातील जन्मधारी उत्तम ब्राह्मण तूच आहेस. माझ्या भ्रूमध्यात हस्त ठेवून त्यांनी शक्तीपात केला. माझी कुंडलिनीशक्ती जागृत झाली.

Statue Shripad.jpg

बालयोगी रूपातील श्रींचा पीठापुरातील दर्शन

49
पुढील कथा भाग उद्या बोलू म्हणून थांबले.
नरसावधानींचे नीच पुर्वचरित्र
पहिल्या पाढदिवसाच्या दिवशी श्रींनी  बापन्नांना आठवण करून दिली की पुर्व जन्मीचे आपण सत्य ऋषी आहात. श्री शैल्य व गोकर्णातील अनिष्ट शक्तींचा नाश करून मला ती अधिक शक्तीशाली करायची आहेत. मी 16 वर्षापर्यंत आपल्या घरी राहीन.
1वर्ष
Samalkpt temple.jpg
सामलकोटच्या कुकुटेश्वर मंदिराचा परिसर

45
श्रीपादवल्ल्भांची जन्म कुंडली
दि 17 ऑगस्ट 1320 गणेशचतुर्थीला जन्म उषकाली सिंह लग्नात चित्रानक्षत्रावर
कुंडली अ. 6 पान 45 श्रपदवल्लभ 17 Aug 1320.PNG
अ.4 पान 27 वर 23 मे 1336 हा दिवस तिरुमलदास म्हणतात की शुभयोगांनी युक्त  अति उत्तम आहे. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा ही विनंती.
 25 May 1336 Horoscope  अ 4 पान 23.PNG

No comments:

Post a Comment