Sunday 1 January 2012

चिन्मय ओक सांगतायत आपले विचार


आमचे चितळे बाबा

चिन्मय ओक दि 01जानेवारी 2012.

नमस्कार, माझे नाव चिन्मय ओक. खरे तर लहानपणापासून माझा देवावर विश्वास कमी, त्यात मी ओशोचा मोठा फॅन. त्यामुळे मूर्ती पूजेवर माझा विश्वास कमीच. अशाच मनःस्थितीत माझी पु. चितळे बाबांशी भेट झाली. सुरुवातीला मला ते अगदी साधे वाटले. त्यांच्यात “गुरु” म्हणण्यासारखे काही वाटले नाही. गुरु म्हटल्यावर आपल्या समोर एक वेगळीच आकृती उभी राहते. केसांची मोठी जटा, कपाळ भर गंध, भगवे वस्त्र, खांद्याला झोळी इत्यादि ...

मी जेव्हा बाबांना पहिल्यांदा पाहिले तेंव्हा ते अगदी क्लीन शेव्हन, व्यवस्थित भांग पाडलेले, साध्या कपड्यात दिसले.

मी सर्वात प्रथम बाबांकडे सन १९९९ मध्ये बहिणीच्या डोकेदुखीच्या त्रासामुळे गेलो होतो. त्यांनी तिचा डोक्याचे दुखणे अवघ्या काही तासात बरे केले. (जी डोकेदुखी बरेच दिवस डॉक्टरांकडे जाउन देखील ठीक होत नव्हती). हा माझा पहिला अनुभव. मी पहिल्यांदाच गेलो असताना त्यांनी मला गुरुवारच्या पूजेला बोलावले. मला पूजेत रस नसल्यामुळे मी काही लगेच गेलो नाही. काही दिवसांनी मी पुन्हा बहिणी बरोबर गेलो असताना त्यांनी मला गुरुवारी न आल्याबद्दल आवर्जून विचारले. तेव्हा पासून आजपर्यंत मी गुरुवारच्या पूजेत येतो आहे.

मी त्यांना सुरुवातीला काही दिवस “महाराज” म्हणायचो पण थोड्याच दिवसांनी त्यांना “बाबा” संबोधायला लागलो. कारण “बाबा” या शब्दात जास्त आपुलकी वाटते.

जेव्हा कधी कुठला अनोळखी माणूस आपला प्रॉब्लेम घेउन बाबांकडे येतो. त्यावर बाबा त्याला “बेटा घबरा मत... बाबा के होते हुए कोई घबराने की बात नही” सांगतात (अशा वेळी ते ज्यांना बाबा म्हणतात ते म्हणजे बाबा जालंधरनाथ) आणि तत्क्षण प्रॉब्लेम घेउन आलेल्या माणसाच्या चेहेऱ्यावर नैराष्याचे भाव जाऊन आशेचा उजेड दिसु लागतो. बाबांनी त्याला पूर्ण बरे व्हायचे आश्वासन दिल्यावर तो आनंदी मनाने घरी जातो. काही दिवस बाबांनी सांगितलेले औषधोपचार आणि तोडगे केल्यावर, त्याचावर आलेल्या कठीण प्रसंगातून तो सहजरित्या बाहेर पडतो. त्याचे काम पूर्ण झाल्यावर जेव्हा बाबांना सांगायला तो येतो, तेंव्हा बाबा अगदी सहजपणे त्याला आठवण करून देतात, “मैने तो कहा ही था, बाबा के दरबार मे कोई खाली हात नही जाता”. अश्या रीतीने बाबांना अनोळखी असणारा माणूस सहजच बाबांचा शिष्य बनून जातो.

बाबा नेहमी म्हणतात, “बाबा होना आसान नही है ”. याचा अर्थ आम्हाला बऱ्याच वर्षांनी कळला. बाबा प्रत्येकाला समान वागणूक देतात. त्यांच्या लेखी जात, धर्म, उच्चपदी ऑफिसर किंवा चपरासी सगळे सारखेच. बाबांना आपल्याकडे आलेल्या माणसाचे दुखः पूर्णपणे जाणतात तसेच त्याच्या आनंदात पूर्णपणे सामील होतात. त्यामुळे बाबा सगळ्यांना आपले आपलेसे वाटतात. बाबांचे घर सगळ्यांसाठी सतत उघडे. तोच त्यांचा “आश्रम”. बाबांनी गृहस्थाश्रमात राहून अध्यात्मिक होउन दाखवले. बाबांनी संसारात राहूनच अध्यात्म साधले. संसार आणि अध्यात्मातला तोल सांभाळून गेली कित्येक वर्षे ते महाराजांची सेवा करत आहेत. बरेच लोक नुसते गप्पाच मारताना आपण पहातो मात्र आमच्या बाबांनी सांगितले ते केले असे प्रत्यक्षात करून दाखवल्याचे अनेक दाखले आहेत.

आमचे बाबा बहुआयामी आहेत. बाबांचे अनेक शिष्य. प्रत्येकाचे वेगळे प्रॉब्लेम. सगळे जण आपला प्रॉब्लेम बाबांना सांगून मोकळे होतात. सगळ्यांना माहित आहे बाबा असताना काही घाबरायचं कारण नाही. बाबांचे प्रत्येकाशी वेगळे नाते आहे. समोर बसलेल्या व्यक्तीची कुवत, त्याची मानसिक स्थिती, त्याचा ओढवलेला प्रसंग याच भान ठेउन बाबा सगळ्यांशी वागतात. बाबा कुणालाच निराश करत नाहीत. प्रत्येक शिष्याला आपुलकीने विचारपूस करतात, वेळोवेळी सल्ला देतात, त्यांच्या अनेक अडचणी यायच्या आधीच त्याचा तोडगा सांगतात. बाबांनी एकदा का कुठली केस हातात घेतली कि तो पेशंट बरा होई पर्यंत बाबांचे त्यावर पूर्ण लक्ष असते. त्यात त्यांना रोगाचं “फीड बॅक” देणे अत्यंत महत्वाचे असते. खूप वेळा बाबा स्वतः फोना-फोनी करून विचारपूस करतात. तो पेशंट पूर्ण बरा झाल्यावरच बाबा शांत बसतात.

माझा व बाबांचा आणखी एक जवळचा धागा आहे. त्यांच्या पत्त्यांच्या अड्डयातील मी एक भिडू आहे. दश्शी पकडसाठी. त्यामुळे आनंद धाग, पराग पटवर्धन, अबु उर्फ अभिजित, शिवाय अधुन मधून पपु उर्फ शैलेश असे दश्शी पकडीत बाबांचे भिडू बनतात.

सामान्यतः दर गुरुवारी पुजेनंतर रात्री 10 ला आमची बैठक सुरू होते. मध्य रात्र उलगडते. त्यानंतर आम्ही घरोघरीवर कधीतरी परततो. आज काल मला विवाहानंतर शनिवारी वेळ मिळू लागल्याने तो वार बाबांनी ठरवला आहे. खेळताना डावाकडे, हातातील पत्यांकडे काय खेळायचे व कसे विरुद्ध बाजूला हरवायचे याचे प्लानिंग करावे लागते. सतर्कपणे खेळावे लागते. त्यात पुन्हा जर बाबांचा भिडू असलो तर विशेष खबरदारी घ्यावी लागते. नाहीतर बाबांची खपा मर्जी व्हायला काय वेळ?

... काही वर्षांपुर्वीपर्यंत राजेश नारायणन नावाचा उमदा प्रिय तरुण साधक आमच्यातून दुरावला. त्याचे वैषम्य बाबांना फार आहे... चार लोक नसतील तर बाबा मग रमी उर्फ पपलूवर समाधान मानतात. तर कधी बुद्धिबळाचा पट पसरून ठाकुर सरांच्या हितेश, विक्रम दालमिया, नाही तर भेटायला आलेल्या उत्साही साधकांना बाबा पटावर बसवतात.

तर असे आमचे बाबा.... आणखी आठवले की भर जरूर घालेन सध्या इतकेच....