Tuesday 13 May 2014

9. चितळेबाबा सांगतायत स्वरक्षणाच्या युक्त्या



पुज्य चितळेबाबा दरवर्षी आमच्याकडे गणेशोत्सवात दर्शनाला येतात. यावेळी आमच्या सुनबाईंनी नुकत्यासजवलेल्या हॉलची पहाणी करायला बाबा आवर्जून आले होते. त्यावेळी चिन्मयाच्या मित्रांना बाबा आपले स्वरक्षण करायला सांगत असताना त्यांनी तीन समोरून आणि एक मागून कोणी हल्ला करायला आले तर कसे लढावे याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्या दिवशी बाबांच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू कळाला.
ते सांगत होते कि सुरवातीच्या काळात हवाईदलातील मल्लांच्या संघातून त्यांनी बक्षिस मिळवले होते. त्यांचा दरारा एक दमदार कुस्तीगीर म्हणून होता.