Monday 21 January 2013

भाग 2...चितळे बाबांचे बधू - श्री अशोक चितळे यांनी सांगितलेल्या आठवणी.



चितळे बाबांचे बधू - श्री अशोक चितळे यांनी सांगितलेल्या आठवणी. भाग 2...
 संकलनः शशिकांत ओक
3) अंकित एक ब्रह्मराक्षसाला आज्ञा - उन्हाळ्याची सुटी संपली की तात्याला ड्युटीवर जायचे वेध लागायचे. आईवडील देवाघर गेल्यानंतरची गोष्ट. देऊळगावला मी, माझी पत्नी सौ. वैशाली, विदुल व चि.निलेश राहात असू. त्या वेळी श्री काजळे मामांसमोर घटलेली एक घटना सांगतो. माझ्या पत्नीला ओकाऱ्याचा त्रास सुरू झाला. समोर जेवणाचे ताट घेतले की ओकारी होत असे. त्या पुर्वी आमचे शेजाऱ्याशी जागेबाबत भांडण झाले होते. त्यांनी अघोरी विद्येचा वापर केला होता.  असा तिला संशय होता. तिने ते सर्व तात्यास अगदी निघायच्या आधीच्या रात्री 10 वाजता सांगितले. तात्यांनी घराजवळच्या निंबोणीच्या झाडाची एक निंबोणी तोडून त्याला एक टोचणी खोचून, ‘‘जगन, (तात्याच्या अंकित एक ब्रह्मराक्षसाला आज्ञा केली) ज्या कोणी ती विद्या पाठवली असेल ती जळून जाईल असे कर’. मी झोपतो. रात्री 11 वाजता खिडकीत कावळा कावकाव करील त्याच वेळी पीडा दूर होईल. असे म्हटले! आणि खरोखर रात्री 11ला एक कावळा खिडकीत आला! कावकाव केली व गेला! त्यानंतर सौ.नी जेवण केले. ते ओकारी होऊन पडले नाही!....



4) भिती घालवली आमचे शेजारी विष्णू पोतदार म्हणून राहायचे. संध्याकाळी गप्पा मारणेस ते आमच्या ओट्यावर येत. अशाच गप्पा रंगल्या. ते म्हणाले, पुर्व मुखी महादेव मंदिराजवळ पहाटे 3-4 वाजता एक मोठी आकृती आडवी येते. खूप भिती वाटते. तो म्हणाला, माझ्या तळहातात पहा. ती आकृती हीच आहे काय? असे म्हणत तात्यांनी पोतदार यांना ती आकृती दाखवली. तेंव्हा ते भितीने 4 हात दूर  पाठीमागे फेकले गेले.  तीच आकृती त्यांना तात्याच्या तळहातावर दिसली होती.!....



5) काविळीचा पिवळेपणा संपला - माझी मुलगी चि. विदुली इनलॅक बुधराणी हॉस्पिटलमघे प्रसूत झाली. डिसचार्ज मिळाला. पण 6 दिवसांनी सौ. विदुल तपासणीस गेली. बरोबर मुग्धाला (तिची मुलगी) ही बरोबर नेले होते. ती पिवळी पडली होती. डॉ.नी तिला लगेच एडमिट केले. कोणासही भेटण्यास मज्जाव केला. कारण तपासणी अंती पिवळेपणा मर्यादेपेक्षा जास्त आढळला. ही घटना तात्यास कळवली. त्यानी मी तिला प्रत्यक्ष एकदा पाहतो असे सांगून दवाखान्यात येऊन पाहिले. काही मंत्रोच्चार करून उद्या बरी होईल असे सांगितले. डॉ.नी तर रक्त बदल करण्याचा एकमेव उपाय सांगितला होता. मात्र दुसऱ्या दिवशी पुर्ण तपासणीत पिवळेपणा एकदम कमी झालेला दिसला व मुग्धा ठणठणीत बरी झाली. सध्या ती पाचवीत शिक्षण घेत आहे ....

6) मुलगा नाचत घरी गेला - आमचा शेतकरी मित्र श्री. रमाजी खांडेभऱ्हाड होता. त्याला एकुलता एक मुलगा - बजाबा. तो खूप दिवस आजारी होता. खूप औषध, गंडेदोरे झाले, पण तो अंथरुणातून उठून फिरू सुद्धा शकत नव्हता. तात्या एकदा फिरता फिरता रमाजी मामांकडे गेला होता. त्यांना तात्याबद्द्ल थोडी कल्पना होती. त्यानी सर्व परिस्थिती कथन केली. तात्याचा मनांत दया उत्पन्न झाली. त्यानी बजाबाला उभे करवले व घराजवळील नाल्यापर्यंत नाचवत नाचवत नेले! हे दृष्य तेंव्हा उपस्थित खूप जणांनी पाहिले. तो मुलगा त्यानंतर चालायला लागला व एकदम चांगला झाला.  अजून जीवंत असून दैनंदिन व्यवहार सुरळीत करत आहे! ---

7) विंचू  दंशावर उपाय. - तात्या सुट्टी वर आलेला  होता.  नेहमी  प्रमाणे तो सायंकाळी  तो अंघोळ  करून  फिरायला गेला. तो गवंडी गल्लीतील गयाबाई दूधवाली  विंचू चावला  म्हणून आली.  वडिलांनी  मंत्र टाकले.  पोटॅशियम परमॅंगनेट टाकले. लिंबू पिळून पाहिले. पण  विंचवाची आग कमी होत  नव्हती.  तात्या मंत्र सामर्थ्याने विंचू उतरवत  असे. पण हे कोठे  असतील  याचा पत्ता नसे. परंतु श्री बालाजीच्या फरसावर  त्यास बातमी  कळली. घरी आले.  एक हातभार घातला  तर गयाबाई तीव्र वेदनेने खाली कोसळली. तिचे तोंडातून फेस येऊ लागला.  हा प्रसंग  फारच वेगळा  होता. बाई आमचे घरीच मृत होते कि काय असे  वाटू लागले! त्यानी गार पाण्याची  अंघोळ  घातली. तुळसीपत्र हातात  घेऊन  काही मंत्र म्हटले.  बाईस जेथे  दंश झाला  होता  तेथे  तो लावला. 'बाई ऊठ, तुला काहीच झाले नाही.' असा आवाज  काढला.  ती बाई शुद्धित  आली  आणि  आग कमी झाली  म्हणत  आपल्या पायाने घरी गेली. आम्हीं  सर्व काळजी मुक्त झालो...

असेच विंचू दंशाबाबत आठवते... एकदा स्वस्तिक मेडिकल स्टोअर्सचे मालक श्री सावजीडॉ.कोठरकर,  का डॉ.काणे नीट आठवत नाही. असे एकदा  गप्पा मारत बसले असताना  एकजण विंचू चावल्यावरचे औषध मागायला आला. तात्या तिथे  उपस्थित होता.  डॉ. म्हणाले, 'आम्ही कोकेनचा प्रयोग करतो. एकनाथ त काय करतोस्?'
'
मी मत्रशक्तीने विंचू विष उतरवतो. असे म्हणून तात्याने ती केस मंत्र म्हणून क्षणांत बरी केली. व तो माणूस हसत परत गेला.
8)
निधड्या  छातीचा  व हळव्या मनाचा - प्रसंगी  दहा माणसांनाही जड जाणारा तात्या अंगी  एकदम माझे अंगात हत्तीचे  बळ निर्माण होते. याचा प्रत्यय मी श्री बालाजी महाराजांचे यात्रेत  अनुभवले आहे.एकदा त्या  गर्दीत मंदिर पोलिसांनी मला आडवले.  हे लक्षात येताच तात्याने  तीन  पोलिसांना  हवेत उडवलेले मी पाहिले आहे ....

9) श्री पवार यांना  डाकीण दाखवली. - श्री पवार हे देऊळगाव राजात तहसिलमधे असतानासंध्याकाळी  तात्या व ते फिरायला केले. उन्हाळा होता  नदीला पात्राला पाणी नव्हते.  नदीवर अंधार  होता.  एखादी मोटरयायची कोणते रुळावर प्रकाश पडायचा. तात्या धूम्रपान करत असताना  काड्याच्या पेटीतील शिलगावून एकासारखी विझत होती. हे म्हणाले, ' अग्नितत्व विझते म्हणजे काहीतरी आहे. कोण आहे रे? ‘ म्हणताच नखशिखांत भिजलेली तरुण स्त्री  पुलाखालून समोर आली  व म्हणाली,  ' महाराज  मला बोलावले' तात्या पवारला म्हणालेतुला  डाकीण बघायची आहे ? ही बघ आली. धर तिचे केस’! पवार खरे तर सैन्यातtन निवृत्त झालेलॆ साहसी. तेही हादरून गेले! कोरड्यापात्रातून ही ओलेती होऊन आली कशी? असे वाटून खूप घाबरले.  ‘नको, नको, बास बास म्हणून   रदरून आलेला  घाम पुसला. तात्याने  तिला परत जाण्यास  आज्ञा केली. ती पुलाखाली गेली. त्याच वेळी  पुलावर येणार्‍या एका मोटारीचा प्रकाश पुलावर पडला. त्या प्रकाशात पवारांनी तिचा पाठलाग केला. पण त्यांना ती कोठेही दिसली नाही. श्री पवार नंतर मोशी जिल्हा अमरावती येथे असताना  निधन पावले.  त्यांनी स्वतः सांगितलेला अनुभव ...

10) श्री यादवेंद्र काजळे यांना  डाकिणीपासून अलिप्त ठेवले.
भारतीय वायुसेनेत  कार्यरत असलेले व तात्याचे जिवलग शिष्य श्री.काजळे  एकदा  बरोबर प्रवास करत होते.  सुटीवरुन येताना थेट जालना गाडी मिळाली  नाही  म्हणून सिल्लोड येथे रात्रीचा मुक्काम  स्टँडवर करावा लागला. त्याकाळी स्टँडवर प्रकाशाची जास्त सोय़ नव्हती. कानपुरहून प्रवास करत आलेले. रात्र खूप  झाली होती.  एक ब्लँकेट टाकून तात्या  पहुडला होता व काजळे  पाय दाबत  होते.  त्या रात्रीत एक सुस्वरूप तरुणी दहा फूट  अंतरावर  आली. व काजळेकडे  अंगविक्षेप करून  बाहेर एकांतात येण्यासाठी खुणा करू लागली.  अंथरुणाचेजवळ तिला येता येत नव्हते.  तात्याला दुसऱ्या दिवशी  त्यांनी विचारले कोण असावी ती बाई? तात्या म्हणाला, अरे ती डाकीण  होतीकाजळे, तू अंथरुणाबाहेर गेला नाहीस  म्हणून वाचलास! हा अनुभव प्रत्यक्ष श्री यादवेंद्र काजळेनी सांगितला आहे. हे काजळे हवाईदलातून निवृत्त होऊन  सध्या वानप्रस्थाश्रमात जीवन व्यतीत करत आहेत.  मध्यंतरी  तात्याला  अपघात झाल्यावर ते अचानक दत्त म्हणून  पुण्यात हजर झालेकाही दिवस तात्याच्या आजारपणात त्याची शारीरिक सेवा केली. बरे झाले असे दिसताच ते एके दिवशी पुन्हा गावी गेले. तात्याच्या सानिध्यात सर्वांत जास्त काळ राहिलेले  व संसारात रमवाण न होता एक विशिष्ट ध्येय लक्षात ठेऊन गुरू आज्ञा प्रमाण मानणारे एक आदर्श शिष्य असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे ....
11) उपजत ज्योतिष विद्या
देउळ गावराजा गावात आमचे वडील माधवराव जोशी (चितळे ) गावपाटील होते व श्री माधवराव कुळकर्णी (तलाठी) होते.  त्यामुळे आमचे खूप घरोब्याचे संबंध होते.  सर्वजण त्यांना पांडेबुवा म्हणायचे वयाची 100 वर्षे पुर्ण करून त्यांचे  निधन झाले. ते उत्तम  ज्योतिष सांगायचे.  दरवर्षी माझा तात्या दसरासणा निमित्त घरी अकस्मात यायचा. एकवर्षी दसर्‍याचे जेवण झाले  तरी पण आला नाही म्हणून वडिलांनी त्यांना प्रश्न  केला. 'धनु का आला नाही?' ते उत्तरले, 'आगगाडीच्या डब्यात आग  लागल्याने  उशीर होत आहे'. ते विधान नंतर तंतोतंत खरे  ठरले. मात्र तात्याने कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता  पत्रिका वाचन व विष्लेषण प्रत्येक गोष्टीत करून दाखवत अचुक भाकितांचा अनुभव येतो. सद्यस्थितीत पत्रिका तोंडी मांडणेकोणता ग्रह कोठे कसा कार्यरत आहे हे सांगणे हे तात्याचे वैशिठ्य  आहे.  केवळ  गुरू कृपेनेकोणत्याही प्रकारचा अभ्यास ऩ करता  फलित सांगणे केवळ अशक्य. मी त्याला विचारेहे कसे शक्य झाले? तेंव्हा त्यानी एकदा उत्तर दिले की मी पुर्वजन्मी देवगिरीच्या किल्ल्यातील बाणभट्टाचा अवतार आहे.  त्यांचेच अभ्यास कार्य कामी येते. मी लहानपणापासून त्याचे बरोबर आहे पण मला त्याच्यातील अगाध शक्तीचा शोध घेता आलेला नाही.....!

Friday 4 January 2013

भाग 1... चितळे बाबांचे धाकटे बंधू श्री. अशोक सांगतायत बाबांच्या लहानपणीच्या अदभूत अठवणी!

भाग 1 ... चितळे बाबांचे धाकटे बंधू - श्री. अशोक सांगतायत बाबांच्या लहानपणीच्या अदभूत ठवणी 
।।श्री ।। 
  माझा  तात्या
विदर्भात मोठ्या  भावाला तात्या  म्हणतात. मी लहानपणापासून भावाला तात्याच म्हणतो व मलाही तसाच प्रतिसाद मिळत आहे. आमच्या प्रदेशात पाठच्या  भावाला 'पाठ फोडून आलेला' म्हणतात. त्याप्रमाणे प्रत्येक प्रसंगी तात्या माझे पाठीमागे कायम उभा असतो.

काही अभूतपूर्व अनुभव
मला आठवतय मी काहीतरी 5वी किंवा  6वीत असेन.आमच्या गल्लीत आम्ही पाटलाची पोर! त्यामुळे सडकेवरच्या मुलात व आम्हांत कधीच जमत नसे. काहीतरी  कारण काढून एकदा  माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यामुळे मुले मारू लागली. मी एकटा त्यांना प्रतिकार करू शकलो नाही. तेवढ्यात कोणीतरी म्हणालं,  'पाटलाचा धनु दवाखान्याच्या बाजूने येत आहे!पळा!'  तात्यास ही सर्व परिस्थिती लक्षात आली. एकट्याने नऊ जणांना झोपवले! एक प्रमोद गुप्ता म्हणून होता, त्याची पाठ अक्षरश: फोडून काढली!  
वक्तृत्व
1. संभाषणामधे ते अजूनही कोणास पुढे जाऊन देत नाहीत. शाळेत स्वयंस्फूर्त भाषणे आयोजित केली जात.समोरील चिठ्ठी उचलून त्यावरील विषयावर  भाषण करावयाचे असे. प्रत्येक बक्षीस समारंभात वक्तृत्व  स्पर्धेत क्र.1चे बक्षिस म्हणजे "एकनाथ  चितळे" हे हमखास ठरलेले! गावातील प्रतिष्ठित व वक्ते श्री आबासाहेब बक्षी म्हणायचे, 'हे क्षात्र तेज आहे परशुरामाचे! ह्याचे वाटेल चुकूनही जाऊ नका".

 
2. आमचे वडील खूप  आजारी होते. त्यांना बाजेवर उठून बसता सुद्धा येत नव्हते.  तात्या सुट्टावर घरी आला होता. आई म्हणाली, 'अरे धनू, ह्यांची तब्बेतीस काय झाले कळत नाही. डॉ चे औषधाने फारसा गुण वाटत नाही.' त्याला काय वाटले कोणास ठाऊक. रात्री बाहेर अक्षता घेऊन महाराजांचे स्मरण करून माझे वडिलावर कोणी भानामतीचा प्रयोग  केला असेल त्याची विद्या जळून जाईल'. असे म्हणून अक्षता आकाशात फेकू लागला. एकाएकी वडील बाजेवर उठत पद्मासन घालून बसले! 3-3 फूट त्याच अवस्थेत वर-खाली होऊन, "बोल, क्यूं बुलाया? "  असे सारखे  विचारू लागले. "अब कुछ नही होगा. फिक्र मत करो" असे म्हणाले. तेव्हा वडील नंतर ठीक! हे कसं झालं  कळलं  नाही! 

पुढे चालू....