चंदननगर पुणे, नवनाथ पंथीय पुज्य चितळेबाबांच्या संदर्भात साधकांनी सादर केलेले अनुभव. आपण आपले ही पाठवावेत. ही विनंती हवाईदलातून निवृत्त झालेले बाबा सांसारिक व शारीरिक व्यथांना बाबा जालंधर नाथांच्या कृपाआशीर्वादाने ठीक करतात असा अनुभव आहे.
Wednesday 14 December 2011
८. बाबा आणि औषध निर्मिती
६. बाबा आणि भिशी७. बाबा आणि काही पडीक मंडळी
६. बाबा आणि भिशी
बाबांचा आणखी एक आवडता शौक म्हणजे भिशी. व्यापारी वर्गाशिवाय कोणालाही सामिल करुन न घेणारे भिशिचे मंडळ बाबांना आवर्जून निंमंत्रण देते. बाबांनी आजवर अनेक भिशांतून साधारण २० टक्क्यांपेक्षा जास्त व्याज दराने उत्पन्न मिळवून लाखोरुपयांची उलाढाल केलेली आहे. अनेकांना तात्काळ मोठ्या रक्कमेच्या पैशांची सोय करायला अशा भिशीतून त्यांना सहज शक्य होत असावे.
७. बाबा आणि काही पडीक मंडळी
बाबांच्या घरी भेटायला गेले की काही मंडळी हमखास भेटतात. ते आपल्या काही विवंचनांमुळे बाबांच्या आसपास घुटमळत राहण्यात आनंद मानतात आणि बाबा कधी कधी वैतागाने सुद्धा, ‘जा तुझे काम होईल’ असे म्हटल्यावर मगच तेथून आनंदाने निघतात.
-------------------------------------------------------------------------------------------
५. बाबा आणि कुत्र्यांचा शौक
५. बाबा आणि कुत्र्यांचा शौक
काही वर्षांपुर्वी एक पांढऱ्या रंगाचे कुत्रे दर गुरुवारी आरतीच्या वेळी फाटकापाशी व नंतर दरवाज्यापाशी येऊन आत वाकून पहात रखवाली करताना व आवर्जून प्रसाद भक्षण करताना आम्हा शिष्यांनी कित्येकदा पाहिलेले आहे. काही काळानंतर त्याच्या ऐवजी बाबांना घरात एक कुत्रे असावे असे वाटून एक काळ्या रंगाचे छोटेसे पिल्लू आणले. म्हणजे काय त्यांच्या एका शिष्यानी ते आणून दिले होते. तिचे नाव राणी ठेवण्यात आले. राणी घरभर खेळू लागली. विधी करून आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवू लागली. पण बाबांनी तिचे लाड करून तिला राणीसारखी ठेवण्यात कमी केले नाही. नंतर आली ती नाईट. ती ही रंगाने काळी. पण स्वभावाने तिखट. तिने दंगा करून भंडावले. आणि मग तिला साखळीने बांधायची वेळ येऊ लागल्याने तिची रवानगी कुठे तरी केली गेली.
४. बाबा आणि दश्शी पकड
४. बाबा आणि दश्शी पकड
बाबा हवाईदलात असल्यापासून त्यांना पत्ते खेळायचा शौक जडला होता. विशेषतः एस एन सी ओज् मेस मधे म्हणजे वरिष्ट जेसीओजच्या मेस मधे रमी किंवा पपलूचा अड्डा जमत असे. विशेषत ते नाईन बीआरडीच्या शेवटच्या पोस्टींगला आले असताना. निवृत्तीनंतर बाबांचे रमी वगैरे खेळायचे प्रमाण कमी झाले. काही तरुण शिष्यांना ‘दश्शी पकड’ नावाचा नवा रंजक व विचारकरून खेळायला लावणारा डाव त्यांनी शिकवला व खेळायला प्रेरित केले. चारजणांचा खेळ. समोरासमोरचे भिडू. पत्ते वाटल्यावर चारही दश्श्या आपल्याजवळ ठेवण्याची हुशारी व कसब वाटलेल्या पानातून दाखवायचे असते. समोरच्या भिडूंच्या पानांचा अंदाज व खेळणाऱ्यांचा वकूब यावर दश्शी पकड रंगते. साधारणतः गुरुवारच्या साप्ताहिक पुजेनंतर दहाच्या सुमाराला रेंगाळणाऱ्यांना कटवून बाबांचा पत्याचा डाव मांडायला सुरवात होते. पुढे मेंढी-कोट करत करत दोन - तीन तास कसे जातात ते कळत नाहीत. बरं बाबांच्या समोरचा भिडू म्हणून खेळायला बसणे ही एक प्रकारची कसोटी असते. कारण तो डाव संपला की समोरच्याने केलेल्या चुकांची रीतसर कान उघाडणी बाबा संयमाने पण स्पष्टपणे करतात. त्यावेळी कधी कधी कुठून खेळायला बसलो असे वाटत असावे. पैसे लाऊन खेळायपेक्षा निपद्रवी पण रंजक मनोरंजनाचा बाबांना मोठा विरंगुळा आहे. त्याच्या या खेळांमधील भिडू आपापल्या आठवणी सांगतील म्हणून येथे इतकेच.
३. बाबा आणि बुद्धिबळ
३. बाबा आणि बुद्धिबळ
साधारण संध्याकाळी बाबांना भेटता येत नाही. कारण चार-पाचच्या सुमाराला वामकुक्षी नंतर बाबा पट मांडून बुद्धिबळ खेळायला त्यांच्या नेहमीच्या आसनावर म्हणजेच हवाईदलात असताना ते पोस्टिंगला उपयोगी पडणाऱ्या लाकडी बॉक्सच्या दिवाणावर मांडी ठोकून सिद्ध असतात. त्यांना पटावरच्या सोंगट्या पटकन मारून खेळ उगीच झटपट संपवणारा खेळाडू आवडत नाही. फाईट टफ द्यावी लागते. पण शेवटी पटावरील बाबांचा राजा केंव्हा, कसा जिंकेल याची चतुर दक्षता त्यांच्या समोर बसलेल्या शिष्य गणांना घ्यावी लागते. कारण कधी कधी समोरच्याचा राजा जिंकला तर पटावर पुन्हा काळ्या-पांढऱ्या सोंगट्या आपापल्या जागेवर जाऊन नव्या खेळीला सुरवात होते.