Wednesday 14 December 2011

साधक अनुभव - चि. नेहाची डोके दुखी!


चि. नेहाची डोके दुखी!



काही वर्षापूर्वी चि. नेहाला एकाएकी प्रचंड डोकेदुखी चालू झाली. एरव्ही ठणठणीत असणारी मुलगी असहायपणे डोळ्यातून टिपे गाळू लागली. आधुनिक इलाज काम करेनात. बाबांच्याकडे गेलो गाऱ्हाणे सांगितले. त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने त्यांनी सिगारेटचे दोन कडक झुरके ओढले. ‘काही झालेले नाही, चुटक्या वाजवत म्हणाले, ‘आत्ता ठीक करतो. काही मंत्र म्हणून त्यांनी तिच्या डोक्यावर हाताने धक्का दिला म्हणाले, “जा. आता पुढील गुरुवारी ये मग सांग, काय?” .... झाले... त्यानंतर डोके दुखी होती का नव्हती! असा विलक्षण प्रभाव पडला त्यावेळ पासून नेहा भाषेत ती बाबांची फॅन झाली. काही झाले की गाल फुगवून,बाबा बघाना!’ असे म्हणून ती गाऱ्हाणे सांगते तिच्या आर्जवी स्वभावामुळे बाबा हातची केस थांबवून, बोल बेटा म्हणत तिची सांत्वना करतात. मग तो प्रश्न कोणती नोकरी करू का इंटीरियरचा कोर्स करू, का एम की लॉ असा असेल नाहीतर त्यांच्या घरातील कुत्री राणीनाहीतर सध्याची नाईटला खेळवायला तिला देण्याबद्दल पपु काही म्हणला असेल, किंवा तिला डॉक्टरकडे तपासायला नेण्याची गरज असेल.

कचऱ्याच्या डब्यात पहा!

विमाननगर भागातील आमच्या सध्याचा फ्लॅट घेण्याचा सल्ला बाबांनी दिला. त्या आधी सौ. अलकास होणाऱ्या मानसिक आंदोलनांना बाबांच्या विचारांनी मानसिक शांतता लाभली. जुलै २००४ला एक किस्सा घडला. बाबांची शोधक नजर कशी काम करते याचा तो अजब नमुना होता. त्याचे झाले असे - मोलकरणीने कपडे धुवायला घेतले त्यात माझी पँट होती. आदल्या दिवशी प्रवासकरून आल्याने बऱ्याच ५शेच्या नोटांसह पँट धुतली गेली. माझ्या लक्षात आल्या आल्या फोनवरून मोलकरणीस घरातून जाऊ देऊ नकोसअसे सुचवले. मी ही तातडीने परतलो. तोपर्यंत सौ. अलकासमोर तिची अंगतपासणी होऊन काही मिळाले नसल्याने पैसे न घेतल्याचे निक्षुन सांगत होती. तिच्यावर विनाकारण आळ घेतल्याने त्रागा करत होती. पैसे तिने घेतले होते यात शंका नव्हती. मात्र पुराव्याअभावी मी काही घडलेच नाही असे भासवून वेळ मारून नेली. संध्याकाळी तातडीने बाबांच्या कानावर घडलेली गोष्ट घातली. तेंव्हा ते म्हणाले, “पहातो प्रयत्न करून. मिटले डोळे. पुन्हा उघडून विडीचा झुरका काढल्यावर म्हणाले, “नोटा भिजलेल्या व पुरचुंडीसारख्या करून कचऱ्यात दडवल्या आहेत. पहा शोधून’’. आम्ही धावलो. कचऱ्याचा डबा शोधला. हलकेच वरचा कचरा व सटरफटर कागद निघाल्यावर भिजलेल्या नोटाची पुरचुंडी अलगद हाती आली! मोजली. बरोबर होती. पैसे बाबांच्या अचुक वेधामुळे मिळाल्याचे समाधान झाले! त्यांच्या प्रज्ञा शक्तीची सहज चुणुक मिळाली आणि आम्ही त्यांचे चाहते, भक्तगण थक्क झालो. पुढे रीतसर मोलकरणीने पैसे चोरुन लपवल्याचे तिच्याकडून वदवून घेतल्यावर तिला आमच्या संपूर्ण सोसायटीत येण्याला मज्जाव केला गेला. असो.

खराडीच्या भैरव मंदिरातील किस्सा

मी व बाबा एकदा असेच गप्पा मारायला खराडीच्या भैरवनाथाच्या मंदिरामागील नदीच्या पात्रालगत बसून अनेक विषयावर बोलत होतो. रात्र झाली होती. नदीच्या संथ पाण्याच्या पात्रात चंद्राची कोर, चांदण्या, दूरवरचे लाईट्सचे प्रतिबिंब दिसत होते. नीरव शांतता होती. इतक्यात बाबा उठले व पात्राच्या पाण्यात जणू काही आहे असे बोलू लागले, ‘हं काय पायजे. कोण तू जा ना बाबा. मागे वळून मला म्हणाले, ‘तो पहा तो नदीच्या मध्यात दिसतोय का एक म्हातारा. सोडवा म्हणतोय. मी चक्राऊन संथ पाण्यावरील अंधारात काही दिसतेय का ते कसून पहात होतो. मला कसचे दिसायला. बाबांचे संवाद चालू होते. एकदा तर तो अगदी १५-२० फुटावर आला होता. तेंव्हा बाबा म्हणाले, ‘ते पहा पाण्यात कसे बारीक तरंग उमटलेत. मी ते पाहू शकलो. नंतर बाबा पुन्हा पायरीवर बसून म्हणाले, ‘३५० वर्षाचा जीव आहे. भरपूर सोने देतो. पण आता या योनीतुन बाहेर काढा. म्हणून मागे लागलाय. शेवटी वेळ इतकी आली की आम्हाला तो आत्मा बोलून देईना. त्याचे वर्णन करताना बाबा म्हणाले, ‘जसा कागदाच्या पुठ्य़ाचा कटआऊट पाण्यात उभा ठेवला तर कसा दिसेल तसा तो हालचाल करतो. शेवटी कंटाळून तो पलिकडच्या तिरावर गेला असे बाबांनी म्हटले. पण मला त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडले नाही.

2 comments:

  1. Shashikantji krupaya babancha address milel kay aamhala babana bhetun aamchi garhani sangun aashirvad ghyaycha aahe. ...maza cell no 9767506633 aahe

    ReplyDelete