Wednesday 14 December 2011

श्री नवनाथ भक्तिसार पोथी - प्रस्तावना

श्री नवनाथ भक्तिसार पोथी -


श्री. नवनाथभक्तिसार

प्रस्तावना

हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधिपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा आहे. हा ग्रंथ चाळीस अध्यायांचा आहे. याच्या ओव्या ७६०० आहेत. याचा ग्रंथकर्ता धुंडिसुत ' मालुकवि ' या नावाचा आहे. तो नरहरी वंशातील असून परमभक्त आहे. त्याचप्रमाणे हा ग्रंथ भक्तिरस व अदभुतरसाने परिपूर्ण भरला आहे. हा ग्रंथ शके १७४१ प्रमाथी नाम संवत्सरांत ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला लिहून पूर्ण झाला असा ग्रंथात उल्लेख आहे. श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधामध्ये नवनारायणांचे संवाद निमि राजाशी झाले आहेत. ते नवनारायण ऋषभदेवांच्या शंभर पुत्रांपैकी नऊजण भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. भगवान द्वारकाधीशांच्या आज्ञेवरुन कवी नारायणाने मच्छिंद्र हे नांव धारण केले, हरीने गोरक्ष, अंतरिक्षाने जालंधर, प्रबुद्धाने कानिफ, पिप्पलायनाने चरपट, आविहोंत्राने नागेश, द्रुमिलाने भरतनाथ, चमसाने रेवण व करभाजनाने गहिनी अशी नावे धारण केली व कलियुगात अवतार धारण केले. हा नवनाथांचा संप्रदाय मूळ श्रीदत्तात्रेय गुरुंच्यापासून प्रवृत्त झाला असून आजही आजही या संप्रदायात दिव्य तेजस्वी लोकांची उज्ज्वल परंपरा दिसून येते. श्रीनवनाथभक्तिसार या ग्रंथात नवनाथांचे अदभुत चरित्र वर्णिलेले आहे.

----

बाबा जालंधर नाथ -

Figure 18 बाबा जालंधर नाथ

शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नि काढून जाळून टाकिलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे; यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे. ते अशा रीतीने की, कुरुवंशात जनमेजय राजाने नागसत्र केले आहे, त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करील; तेव्हा द्विमूर्धन (अग्नि) गर्भ सांडील. त्या प्रसंगी जालंदराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे....

...नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करित होते. शके सत्राशें दहापर्यंत ते प्रकटरूपानें फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्यें कानिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजुनें मच्छिंद्रनाथ ज्याच्या बायबा असें म्हणतात तो राहिला. जालंदनाथास जानपीर म्हणतात, तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यासच गैरीपीर म्हणतात. वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ वीटगांवीं राहिला चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अंडबंगी नाथ गुप्तरुपानें अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत. भर्तरी ( भर्तृहरि ) पाताळीं राहिला. मीननाथानें स्वर्गास जाऊन वास केला. गिरिनारपर्वतीं श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमांत गोरक्षनाथ राहिला.

-----------------


No comments:

Post a Comment