Wednesday 14 December 2011

२.बाबा आणि बिडी - सिगारेट




२.बाबा आणि बिडी - सिगारेट



बाबांना खूप पुर्वीपासून सिगारेट ओढायचा नाद. वेळ, काळ आणि खिशातील गर्मी यावर बिडी ते साधी सिगारेट ते उंची-विदेशी सिगारेट्स-सिगार असा त्यांचा शौक पुढे-मागे होत असतो.

बोलता बोलता झटकन सिगारेट पेटवून बाबा आपले बोलणे आणखी धमाकेदार करतात व अखंडपणे विषय चालू राहातो. कधी बाहेरून आत आलेल्या भगत गणांपैकी कोणाकोणाला ते त्याने दरवाज्यात पाऊल ठेवताच, जा रे सिगारेटची पॅकेट घेऊन ये किंवा बिडीची दोन बंडले आण असा आदेश देतात. त्यांच्या नेहमीच्या बसायच्या जागी डाव्याहाताला असलेल्या बाजूला खिडकीत सिगारेट्स वा बिडीचे बंडल सहज हाताला येईल अशा बेताने ते ठेवतात. कधी कधी त्याशिवाय काही मोजक्या वस्तू - चष्मा, पेन, आजकाल मोबाईल आणि दात्यांचे पंचाग अशा गरजेच्या वस्तू पटकन हाताशी येतील अशा त्यांना आसपास लागतात.

कधी कधी बाबा सिगारेट आणि बिडीचा शौक कमी करतात किंवा थांबवतात. मधे एकांनी खास अमेरिकेहून चिकटपट्याप्रमाणे काही पट्ट्या पाठीला व छातीला लावून बाबांनी त्यांचा सिगारेटचा शौक थांबवण्यासाठी उपाययोजना केली होती. बाबा कधीकधी म्हणतात की मी ओढलेल्या सिगारेट किंवा बिडीची राख जेथे टाकतो त्यामुळे काही अपप्रकार असेल तर ती बाधा दूर होते आणि ते खरे ही आहे याचा पडताळा अनेकांनी घेतलेला आहे.

No comments:

Post a Comment