Wednesday 14 December 2011

नाडी ग्रंथांच्या शोधात हिमालय यात्रा

नाडी ग्रंथांच्या शोधात हिमालय यात्रा

मनोगत दिवाळी २०११ अंकातील लेख

मी बाबा बोलतोय!खणखणलेल्या फोनवरून बाबांचा आवाज!


आमचे चितळेबाबा

२ जानेवारी २००३. हलवाऱ्याच्या हवाईदलातील माझ्या वरिष्ठ लेखा अधिकाऱ्याच्या कार्यालयात मी सकाळीसकाळी स्थानापन्न होतो. इतक्यात फोनवरून बाबा बोलायला लागले, “सांगतो ते पटकन लिहून घ्या. ऋषिकेश, श्रीनगर, चमोली, मंडल, असे करत, चौकाटा या गावापाशी - तुंगनाथाचे महादेवाचे मोठे मंदीर आहे. तुम्हास हवे ते गाव या मंदिराच्या पायथ्याशी आहे. तेथे शोध घ्यावा.मी पटापट लिहून घेताना ते म्हणाले, “दत्त जयंतीच्या दिवशी (१९ डिसेंबर २००२) नाडीग्रंथांच्या शोधाच्या संदर्भात तुम्ही जो प्रश्न टाकलात की पुढील आदेश काय, त्याचे उत्तर मला ध्यानाद्वारे प्राप्त झाले. त्यातून त्या मंदिरात, गावात, भागात, कसे जायचे याची आज्ञा झाली.पुढे ते म्हणाले, “हे मंदीर तुंगनाथाचे आहे हे नक्की. जारनी किंवा दारनी वा दिरनी असे त्या गावचे नाव असू शकेल. पहा, या महितीवरून तुम्हाला काही शोध घेता येतो का ते. बराय!म्हणून त्यांनी फोन ठेवायच्या आत मी त्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि फोन खाली ठेवला.

मनात विचारांची गर्दी झाली. आदेश तर मिळाला. त्याप्रमाणे अंमलबजावणी करायला हवीच. हिमालयात जाणार केव्हा? कसे? कोण? गेले तरी भेटणार कोण? बेचैनी वाढली. ते गाव शोधायचे कुठे? ’ऑप्स-रुममधून त्या भागातील नकाशे आणायला एकाला धाडला. तर दुसरा क्षेत्रीय डाक घरामधून गावांची यादी आणायला धावला

Figure 2 अती थंडीचे दिवस बर्फाचे असे साम्राज्य!

अतिथंडीचे दिवस. गरमागरम चहाचे घोट घेता घेता पुढे आलेल्या कामाच्या फायलींचे गठ्ठे, क्लेम्स, केसेसचा निकाल लावत होतो, पण मन हिमालय़ातील गिरीकुहरात विहरत होते. आठवले, की बाबांनी मला तीन वर्षांपूर्वी एका कागदावर हिमालयात कुठेतरी एका गुंफेत जाण्याचा आदेश दिला होता. मात्र त्याकरता मार्गदर्शक पत्ता तुला तीन वर्षांनी मिळेल म्हटले होते. त्याप्रमाणे आजच बरोबर तीन वर्षे उलटली होती. आपले हवाईदलात राहायचे सहा महिने उरलेत. इतकी कामे आहेत. शिवाय आत्ताच सुट्टीवरून परतल्यामुळे मला पुन्हा सुट्टीचे नावही काढता येणे शक्य नव्हते. शक्य नाहीअसे मनाशी म्हणत मी कार्यालयाबाहेर आलो. तेवढ्यात (तेव्हाचा) स्क्वाड्रन लीडर धनंजय खोत (आताचे ग्रुप कॅप्टन) येताना दिसला. मला नववर्षाच्या शुभेच्छा देत तो परत वळला.

तेव्हा मी अचानक म्हणालो, "अरे जरा आत ये. मला तुझ्याशी बोलायचे आहे." त्याला बाकी काही न सांगता म्हणालो, "दारणी, जारनी किंवा जीरनी असे नाव हिमालयाच्या प्रदेशात शोधायचे आहे. तू ट्रॅकिंग एक्सपर्टआहेस. बघ तुला काही सांगता येते का ते."

का सर एकदम मला विचारताय? काही महत्त्वाचे शोधायचे आहे का?” मला राहवेना. मी त्याला थोडक्यात सांगितले. त्यावर तो मला म्हणाला, “हे बाबा म्हणजे आपले चितळेबाबा तर नव्हेत?" आता मला सर्द व्हायला झाले!

"हो, तेच. पण तू कसा ओळखतोस त्यांना? " मी चकीत होऊन विचारले.

"सर, मागे एकदा स्क्वाड्रन लीडर संजय वझेने (बाबांचे हवाईदलातील नंतर विंग कमांडर म्हणून निवृत्त झालेले एक प्रखर शिष्य) मला चितळेबाबांबद्दल सागितले म्हणून मी त्यांना भेटलो होतो पुण्यात. आमची भेट बराच वेळ चालली होती. त्यावेळी तुमचे नावही चर्चेत आले. त्यांची दीक्षा घेणार होतो, पण कामाच्या गर्दीत राहून गेले. बाबांचा आदेश आहे तर मग प्रश्नच नाही. मी कामाला लागतो. मी माझे सर्व नकाशे तपासतो. मी त्या भागातील ट्रॅकिंगसाठी खूप माहिती गोळा केली आहे. सर, आपण माझ्या घरी येता का रात्री जेवायला? माझी आईपण आली आहे मुंबईहून. तिच्याशी पण आपली ओळख होईल."

पंधरा मिनिटात ठरले व रात्री त्याच्या घरी पसरलेल्या नकाशांच्या भेंडोळ्यातून धनंजय एक एक गावे शोधत होता. ऋषिकेश ,श्रीनगर, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग तर मिळाले. चमोली मिळाले म्हणेपर्यंत, "हे पहा सर, गोपेश्वर. त्या नंतर मंडल. तेथूनच पायवाटेने ५ किमीवर अनुसूया मंदिर आहे. मंडलवरून चोपता. तेच बाबा चौकाटाम्हणत असावेत. त्यापासून तुंगनाथाचे मंदिर पायी ३ किमी लांब व उंचावर आहे."

धनंजय सारख्या कसलेल्या व हिमालयातील गाव अन गाव माहिती असलेल्या अनुभवी ट्रॅकरला या वस्तीवजा गावांची नावे नकाशात पाहून जणू काही प्रथमच सापडत होती. त्यावरून मला बाबांच्या कथनातील बारकावे इतके अचूक येत असल्याचे पाहून आश्चर्य वाटत होते.

...

No comments:

Post a Comment