Friday 4 January 2013

भाग 1... चितळे बाबांचे धाकटे बंधू श्री. अशोक सांगतायत बाबांच्या लहानपणीच्या अदभूत अठवणी!

भाग 1 ... चितळे बाबांचे धाकटे बंधू - श्री. अशोक सांगतायत बाबांच्या लहानपणीच्या अदभूत ठवणी 
।।श्री ।। 
  माझा  तात्या
विदर्भात मोठ्या  भावाला तात्या  म्हणतात. मी लहानपणापासून भावाला तात्याच म्हणतो व मलाही तसाच प्रतिसाद मिळत आहे. आमच्या प्रदेशात पाठच्या  भावाला 'पाठ फोडून आलेला' म्हणतात. त्याप्रमाणे प्रत्येक प्रसंगी तात्या माझे पाठीमागे कायम उभा असतो.

काही अभूतपूर्व अनुभव
मला आठवतय मी काहीतरी 5वी किंवा  6वीत असेन.आमच्या गल्लीत आम्ही पाटलाची पोर! त्यामुळे सडकेवरच्या मुलात व आम्हांत कधीच जमत नसे. काहीतरी  कारण काढून एकदा  माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यामुळे मुले मारू लागली. मी एकटा त्यांना प्रतिकार करू शकलो नाही. तेवढ्यात कोणीतरी म्हणालं,  'पाटलाचा धनु दवाखान्याच्या बाजूने येत आहे!पळा!'  तात्यास ही सर्व परिस्थिती लक्षात आली. एकट्याने नऊ जणांना झोपवले! एक प्रमोद गुप्ता म्हणून होता, त्याची पाठ अक्षरश: फोडून काढली!  
वक्तृत्व
1. संभाषणामधे ते अजूनही कोणास पुढे जाऊन देत नाहीत. शाळेत स्वयंस्फूर्त भाषणे आयोजित केली जात.समोरील चिठ्ठी उचलून त्यावरील विषयावर  भाषण करावयाचे असे. प्रत्येक बक्षीस समारंभात वक्तृत्व  स्पर्धेत क्र.1चे बक्षिस म्हणजे "एकनाथ  चितळे" हे हमखास ठरलेले! गावातील प्रतिष्ठित व वक्ते श्री आबासाहेब बक्षी म्हणायचे, 'हे क्षात्र तेज आहे परशुरामाचे! ह्याचे वाटेल चुकूनही जाऊ नका".

 
2. आमचे वडील खूप  आजारी होते. त्यांना बाजेवर उठून बसता सुद्धा येत नव्हते.  तात्या सुट्टावर घरी आला होता. आई म्हणाली, 'अरे धनू, ह्यांची तब्बेतीस काय झाले कळत नाही. डॉ चे औषधाने फारसा गुण वाटत नाही.' त्याला काय वाटले कोणास ठाऊक. रात्री बाहेर अक्षता घेऊन महाराजांचे स्मरण करून माझे वडिलावर कोणी भानामतीचा प्रयोग  केला असेल त्याची विद्या जळून जाईल'. असे म्हणून अक्षता आकाशात फेकू लागला. एकाएकी वडील बाजेवर उठत पद्मासन घालून बसले! 3-3 फूट त्याच अवस्थेत वर-खाली होऊन, "बोल, क्यूं बुलाया? "  असे सारखे  विचारू लागले. "अब कुछ नही होगा. फिक्र मत करो" असे म्हणाले. तेव्हा वडील नंतर ठीक! हे कसं झालं  कळलं  नाही! 

पुढे चालू....