|
अध्याय 2 सिद्ध
योगिंद्र दर्शन आणि विचित्रपुरचा वृतांत
|
||||||
अ.
|
पान
|
चर्चा कोणाकोणात होत आहे?
|
स्थळांचा उल्लेख नकाशा संदर्भ व उपलब्ध
फोटोसाठी नावावर क्लिक करा
|
कथाभाग
|
श्रींचे वय/
प्रवासाचे अंतर
कि. मी.
|
नकाशा दर्शन
|
2
|
7
|
सिद्धयोगिंद्र व शंकरभट्ट
|
उडुपीहून शंकर भट्ट कसे कन्याकुमारीला पोहोचले. नंतर मरुत्व मलाईहून
मदुराईच्या जवळ पोहोचले. प्रथम जंगलातील व नंतर रत्नजडित शिवलिंग(अतिप्राचीन)
आणि सध्याची सम्पन्न नगरी एकाच वेळी दिसली ते काय झाले होते याचा खुलासा...
धनंजय व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून कुलशेखरपांड्य राजाने मदुराई शहर वसवले. नंतर
धनंजय कुसुमश्रेष्ठी म्हणू जन्मला. इथे काही दैवी रहस्ये दडली आहेत.
|
...
700 किमी
|
||
11
|
|
सिद्ध योगिंद्र
मीनाक्षी पुरम दर्शन, वैद्य वल्लभदास चर्मकार, ते
भेटल्याने ब्राह्मण असल्याचा अहंकार नाश पावला, सर्पदंश,गाढवावरून धिंड काढली गेली कारण
विष्णूना उद्देशून तू मुद्दाम गाढव असा चुकीचा अर्थ करून चेष्टा केलीस, चिदंबरमच्या वाटेवर
विचित्रपुरमचा लहरी राजाशी मूकभाषेतून संवाद व नमकचमक, काहीही येत नसताना
स्वतः च्या तोंडातून आलेल्या अदभूतज्ञानाने चकीत होऊन पुढे वाटचाल
|
...
200 किमी
|
|||
चंदननगर पुणे, नवनाथ पंथीय पुज्य चितळेबाबांच्या संदर्भात साधकांनी सादर केलेले अनुभव. आपण आपले ही पाठवावेत. ही विनंती हवाईदलातून निवृत्त झालेले बाबा सांसारिक व शारीरिक व्यथांना बाबा जालंधर नाथांच्या कृपाआशीर्वादाने ठीक करतात असा अनुभव आहे.
Friday, 30 December 2016
अध्याय 2. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता -सिद्ध योगिंद्र दर्शन आणि विचित्रपुरचा वृतांत
Friday, 16 December 2016
श्रीपादश्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत रसग्रहण प्रस्तावना
श्रीपादश्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत
रसग्रहण
प्रस्तावना
शंकर भट्ट नामक एक स्मार्त {शैव आणि वैष्णव दोन्हीही पंथ मानणारे हिंदू} कानडी ब्राह्मण उडूपीहून कन्या कुमारीचे दर्शन घ्यायला पोहोचले. तिथे त्यांना आदेश मिळाला, 'तू कुरवपुरात श्रीपादश्रीवल्लभ (सन १३२० ते १३५०) यांचे दर्शन घे, त्यांच्या दर्शनाने तुझ्या आत्म्याला, मनाला, अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती होईल. ती दैवी आज्ञा घेऊन नेमके कुठे जायचे हे माहित नसलेल्या पायी प्रवासाला (सन १३३६) ते लागले. असा हा प्रवासवर्णनातून पुढे जाता जाता चरित्र कथन करणारा अनोखा ग्रंथ आहे. वाटेत भेटलेल्या व्यक्तींच्या माहिती व मार्गदर्शनामधून ते पुढे जात राहतात. अध्याय १८ मध्ये त्यांची श्रींशी प्रत्यक्ष भेट होते. त्या आधीच्या अध्यायात श्रीपादश्रीवल्लभ यांच्यात बाललीलांमधून त्यांच्या अद्भुत जीवनाची, अफाट ज्ञानसंपदेची आणि अचाट कर्तृत्वाची महती कळते. शंकर भट्ट अध्याय ५२ पर्यंत ते त्यांच्या बरोबर राहतात. श्रींच्या आज्ञेनुसार श्रींनी कृष्णानदीत गुप्त होऊन गेल्यावर ३ वर्षे ते कुरवपुरात राहून नंतर निघून जातात. पुढे त्यांनी काय केले, मृत्यू कसा आला, याबद्दल अधिक माहिती या ग्रंथात मिळत नाही. हा संस्कृत ग्रंथ नंतर १९८७ साल पर्यंत म्हणजे ६३७ वर्षे श्रींच्या मामांच्या घरातील जागेत खूप खोलवर जपून ठेवला गेला आणि आदेशाप्रमाणे अंधारात राहिला. पुर्व कथनानुसार श्रींच्या ३३व्या पिढीतील भीमावरम येथे वास्तव्यास असलेल्या मल्लादि गोविंद दीक्षित यांच्याकडे अचानक गाणगापुर देवस्थानाकडून अचानक प्रसाद आला. तेंव्हा गोविंद दीक्षित यांना परंपरेने माहित झालेल्या कथनाची आठवण होऊन खोलवर गाडून सुरक्षित ठेवलेल्या त्या जीर्ण ग्रंथाला बाहेर काढून दक्षतापूर्वक नवी प्रत तयार करून संस्कृतमधील जुनी प्रत आदेशानुसार विजयवाटिका (विजयवाड़ा) येथे कृष्णा नदीत विसर्जित करण्यात आली. पुढे या तेलगु मधे भाषांतरित ग्रंथाचे अनेक भाषात प्रकाशन झाले. हैद्राबादच्या ह. भ. प. निठूरकर यांनी मराठीत भाषांतर करून तो २००७ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर पीठिकापुरात (पीठापूर) संत गोपाल बाबांच्या (निर्वाण 20 नोव्हेंबर 2016) निर्देशानुसार सामान्यांना परवडेल अशा १०० रुपयात सुमतीनंदन पब्लिकेशन्स ट्रस्टतर्फे श्रीपादवल्लभ संपूर्ण चरित्रामृत या शीर्षकाखाली प्रकाशित प्रत माझ्या हातात आली.
हा ग्रन्थ निठूरकरांनी भाषांतरित पोथीपेक्षा जास्त माहितीपूर्ण वाटतो. तथापि दोन्हीही ग्रंथ अक्षरसत्य आहेत. संकल्प पूर्वक केले तर प्रचीती देणारे, समाधान देणारे ठरेल असा श्रींनी आशीर्वाद देऊन वाचकांना शब्द दिला आहे. गुरूचरित्र ही पोथी काही शतकांपासून मराठी वाचकांचे श्रद्धास्थान आहे. दत्त संप्रदायातील तीन अवतारातील मधले श्री नरसिंह सरस्वती (सन १३७८ ते १४५८) व त्यांच्या नंतर अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ (सन १८५६ ते १८७८ अक्कलकोट वास्तव्य ) हे पुर्णावतार मानतात.
श्रीपादश्रीवल्लभ यांचे त्रोटक चरित्र गुरूचरित्रात समाविष्ट आहे. श्रीपादश्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात कालांतराने होणाऱ्या त्यांच्या अवतार कार्याचे निर्देश येतात शिवाय त्यांच्या संदर्भात येणाऱ्या अन्य व्यक्ती पुन्हा कोण कोणत्या रूपाने जन्म घेतील याचा प्रत्यक्ष पुरावा त्या त्या मान्यवर विभूती जन्मून गेल्यामुळे मनावर ठसतो. गुरूचरित्रात अनेक उपकथातून समाजाला हितकारक उपदेश मिळतो. कालांतराने मलीन झालेल्या कर्मकांडांची उजळणी त्यात समावेशित आहे. ओवी बद्ध काव्य रचनेने नटलेल्या पोथीत बोजडपणा जाणवतो. श्रीपादश्रीवल्लभ चरित्रामृत पोथीपेक्षा ग्रंथ म्हणणे मला समर्पक वाटते. ते काव्यमय नसून साध्या मराठीतून वाचायला सोपे जाते. अध्याय ३ वर कणाद महर्षींच्या कण सिद्धांत म्हणून वर्णलेले कथन आधुनिक विज्ञानाच्या कक्षातील अॅटम व क्वांटम सिद्धांताला प्रतिपादन करत आहेत असे जाणवते. बाल्यावस्थेतील श्रींना, 'तू कोण? मोक्ष म्हणजे काय? तूच जर सर्व परब्रह्म रूप आहेस तर जीव सुख दु:ख का भोगतो? ज्योतिष शास्त्राप्रमाणे भविष्य नेहमीच खरे येते का? वर्तवलेले भविष्य बदलू शकते का? 'अशा नेहमी गोंधळात टाकणार्या प्रश्नांची समर्पक उत्तरे आधुनिक विचारधारेला बळकटी आणतात. म्हणून कडक सोवळ्यातून मुक्त वाटतो.
या ग्रंथात ताडपत्रावरील नाडीग्रंथ कथनाचा पुरावा मिळतो. शंकर भट्टाची विचित्र कचाट्यातून सुटवणूक जंगम नाडीवाचक कवड्या टाकून मिळवलेल्या भविष्य वाणीने होते. अन्य अध्यायात नाडी शास्त्रातील कथनामुळे घटनांचा अन्वयार्थ काढायला, मान्यता मिळायला शक्य होते.
अनेक प्रसंगात पात्रांच्या एकातून एक कथन पद्धतीतून स्थान कुठे, कोणाचा कोण? अशी गुंतागुंत होते. ती कमी व्हावी. सन १३५० च्या सुमारास निर्देशित खेडी, गावे, नद्या, पवित्र मंदिरे यांचे आजही अस्तित्व आहे का? असेल तर ते नकाशावर कसे दिसते याचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर करायचा प्रयास केला आहे. विविध कथनातून त्या काळातील समाजरचनेचा कानोसा मिळतो. अध्याय ४६ मध्ये चिथावणीखोर लोकांमुळे गावकरी श्रींचे नातलग, चाहते यांना वाळीत टाकले जाण्याइतपत संबंध ताणतात. त्यामुळे तेंव्हाही श्रींना जादूटोणा करणारा असा लोकापवाद सहन करावा लागला होता. हे समजून येते.
ग्रंथ पारायणात सलग वाचत राहायला लागते. त्या व्यतिरिक्त हे लिखाण जवळ ठेवून वाचताना विविध संदर्भांची माहिती हाताशी असण्याची सोय व्हावी म्हणून सादर केले आहे.
पुढील भाग…
अध्याय परत्वे कथा, नकाशा व अन्य माहिती देणार आहे...
ज्ञानसागरातील मोती यामधून काही विशेष विषयावर माहिती सादर केली आहे. त्रुटी अर्थात माझ्या. या माहितीत भर घातली जावी. नकाशावर न सापडलेल्या स्थानांचा शोध जिज्ञासूंनी घ्यावा ही विनंती.
शशिकांत ओक.
Tuesday, 13 May 2014
9. चितळेबाबा सांगतायत स्वरक्षणाच्या युक्त्या
पुज्य चितळेबाबा दरवर्षी आमच्याकडे गणेशोत्सवात दर्शनाला येतात. यावेळी आमच्या सुनबाईंनी नुकत्यासजवलेल्या हॉलची पहाणी करायला बाबा आवर्जून आले होते. त्यावेळी चिन्मयाच्या मित्रांना बाबा आपले स्वरक्षण करायला सांगत असताना त्यांनी तीन समोरून आणि एक मागून कोणी हल्ला करायला आले तर कसे लढावे याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्या दिवशी बाबांच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू कळाला.
ते सांगत होते कि सुरवातीच्या काळात हवाईदलातील मल्लांच्या संघातून त्यांनी बक्षिस मिळवले होते. त्यांचा दरारा एक दमदार कुस्तीगीर म्हणून होता.
Monday, 21 January 2013
भाग 2...चितळे बाबांचे बधू - श्री अशोक चितळे यांनी सांगितलेल्या आठवणी.
चितळे बाबांचे बधू - श्री अशोक चितळे यांनी सांगितलेल्या
आठवणी. भाग 2...
संकलनः शशिकांत ओक
3) अंकित एक ब्रह्मराक्षसाला आज्ञा - उन्हाळ्याची
सुटी संपली की तात्याला ड्युटीवर जायचे वेध लागायचे. आईवडील देवाघर गेल्यानंतरची
गोष्ट. देऊळगावला मी, माझी पत्नी सौ. वैशाली, विदुल व चि.निलेश राहात असू. त्या वेळी
श्री काजळे मामांसमोर घटलेली एक घटना सांगतो. माझ्या पत्नीला ओकाऱ्याचा त्रास सुरू
झाला. समोर जेवणाचे ताट घेतले की ओकारी होत असे. त्या पुर्वी आमचे शेजाऱ्याशी
जागेबाबत भांडण झाले होते. त्यांनी अघोरी विद्येचा वापर केला होता. असा तिला संशय होता. तिने ते सर्व तात्यास अगदी
निघायच्या आधीच्या रात्री 10 वाजता सांगितले. तात्यांनी घराजवळच्या निंबोणीच्या
झाडाची एक निंबोणी तोडून त्याला एक टोचणी खोचून, ‘‘जगन, (तात्याच्या अंकित एक
ब्रह्मराक्षसाला आज्ञा केली) ज्या कोणी ती
विद्या पाठवली असेल ती जळून जाईल असे कर’. ‘मी झोपतो.
रात्री 11 वाजता खिडकीत कावळा कावकाव करील त्याच वेळी पीडा दूर होईल.’ असे म्हटले! आणि खरोखर रात्री 11ला एक कावळा खिडकीत आला! कावकाव केली व गेला! त्यानंतर सौ.नी जेवण केले. ते ओकारी
होऊन पडले नाही!....
4) भिती घालवली आमचे शेजारी विष्णू पोतदार म्हणून
राहायचे. संध्याकाळी गप्पा मारणेस ते आमच्या ओट्यावर येत. अशाच गप्पा रंगल्या. ते
म्हणाले, ‘पुर्व मुखी महादेव
मंदिराजवळ पहाटे 3-4 वाजता एक मोठी आकृती आडवी येते. खूप भिती वाटते’. तो म्हणाला, ‘माझ्या तळहातात पहा. ती आकृती हीच आहे काय? असे म्हणत तात्यांनी’ पोतदार यांना ती आकृती दाखवली. तेंव्हा ते भितीने
4 हात दूर पाठीमागे फेकले गेले. तीच आकृती त्यांना तात्याच्या तळहातावर दिसली
होती.!....
5) काविळीचा पिवळेपणा संपला - माझी मुलगी चि. विदुली
इनलॅक बुधराणी हॉस्पिटलमघे प्रसूत झाली. डिसचार्ज मिळाला. पण 6 दिवसांनी सौ. विदुल
तपासणीस गेली. बरोबर मुग्धाला (तिची मुलगी) ही बरोबर नेले होते. ती पिवळी पडली
होती. डॉ.नी तिला लगेच एडमिट केले. कोणासही भेटण्यास मज्जाव केला. कारण तपासणी
अंती पिवळेपणा मर्यादेपेक्षा जास्त आढळला. ही घटना तात्यास कळवली. त्यानी मी तिला
प्रत्यक्ष एकदा पाहतो असे सांगून दवाखान्यात येऊन पाहिले. काही मंत्रोच्चार करून ‘उद्या बरी होईल’ असे सांगितले. डॉ.नी तर रक्त बदल करण्याचा एकमेव
उपाय सांगितला होता. मात्र दुसऱ्या दिवशी पुर्ण तपासणीत पिवळेपणा एकदम कमी झालेला
दिसला व मुग्धा ठणठणीत बरी झाली. सध्या ती पाचवीत शिक्षण घेत आहे ....
6) मुलगा नाचत घरी गेला - आमचा शेतकरी मित्र श्री. रमाजी
खांडेभऱ्हाड होता. त्याला एकुलता एक मुलगा - बजाबा. तो खूप दिवस आजारी होता. खूप
औषध, गंडेदोरे झाले, पण तो अंथरुणातून उठून फिरू सुद्धा शकत नव्हता. तात्या एकदा फिरता
फिरता रमाजी मामांकडे गेला होता. त्यांना तात्याबद्द्ल थोडी कल्पना होती. त्यानी
सर्व परिस्थिती कथन केली. तात्याचा मनांत दया उत्पन्न झाली. त्यानी बजाबाला उभे
करवले व घराजवळील नाल्यापर्यंत नाचवत नाचवत नेले! हे दृष्य तेंव्हा उपस्थित खूप जणांनी पाहिले. तो
मुलगा त्यानंतर चालायला लागला व एकदम चांगला झाला. अजून जीवंत असून दैनंदिन व्यवहार सुरळीत करत आहे! ---
7) विंचू दंशावर उपाय. - तात्या
सुट्टी वर आलेला होता. नेहमी प्रमाणे तो सायंकाळी तो अंघोळ करून फिरायला गेला. तो गवंडी गल्लीतील गयाबाई दूधवाली विंचू चावला म्हणून आली. वडिलांनी मंत्र
टाकले. पोटॅशियम परमॅंगनेट टाकले. लिंबू पिळून पाहिले. पण विंचवाची आग
कमी होत नव्हती. तात्या मंत्र सामर्थ्याने विंचू उतरवत असे. पण
हे कोठे असतील याचा
पत्ता नसे. परंतु श्री बालाजीच्या फरसावर त्यास बातमी कळली.
घरी आले. एक हातभार घातला तर गयाबाई तीव्र वेदनेने खाली कोसळली. तिचे तोंडातून फेस येऊ
लागला. हा प्रसंग फारच वेगळा होता. बाई आमचे
घरीच मृत होते कि काय असे वाटू लागले! त्यानी
गार पाण्याची अंघोळ घातली.
तुळसीपत्र हातात घेऊन काही
मंत्र म्हटले. बाईस जेथे दंश झाला होता तेथे तो
लावला. 'बाई ऊठ, तुला काहीच झाले नाही.' असा आवाज काढला. ती बाई शुद्धित आली आणि आग कमी झाली म्हणत आपल्या पायाने घरी गेली. आम्हीं सर्व काळजी मुक्त झालो...
असेच विंचू
दंशाबाबत आठवते... एकदा स्वस्तिक मेडिकल स्टोअर्सचे मालक
श्री सावजी, डॉ.कोठरकर, का डॉ.काणे नीट आठवत नाही. असे एकदा गप्पा
मारत बसले असताना एकजण विंचू चावल्यावरचे औषध मागायला
आला. तात्या तिथे उपस्थित होता. डॉ. म्हणाले, 'आम्ही कोकेनचा प्रयोग करतो. एकनाथ तू काय करतोस्?'
'मी मत्रशक्तीने विंचू विष उतरवतो. असे म्हणून तात्याने ती केस मंत्र म्हणून क्षणांत बरी केली. व तो माणूस हसत परत गेला.
8) निधड्या छातीचा व हळव्या मनाचा - प्रसंगी दहा माणसांनाही जड जाणारा तात्या अंगी एकदम माझे अंगात हत्तीचे बळ निर्माण होते. याचा प्रत्यय मी श्री बालाजी महाराजांचे यात्रेत अनुभवले आहे.एकदा त्या गर्दीत मंदिर पोलिसांनी मला आडवले. हे लक्षात येताच तात्याने तीन पोलिसांना हवेत उडवलेले मी पाहिले आहे ....

9) श्री पवार यांना डाकीण दाखवली. - श्री पवार हे देऊळगाव राजात
तहसिलमधे असताना, संध्याकाळी तात्या व
ते फिरायला केले. उन्हाळा होता नदीला पात्राला पाणी नव्हते. नदीवर
अंधार होता. एखादी मोटरयायची कोणते रुळावर प्रकाश
पडायचा. तात्या धूम्रपान करत असताना
काड्याच्या पेटीतील शिलगावून
एकासारखी विझत होती. हे म्हणाले, ' अग्नितत्व विझते म्हणजे काहीतरी आहे.
कोण आहे रे? ‘ म्हणताच नखशिखांत भिजलेली तरुण स्त्री पुलाखालून समोर आली व म्हणाली, ' महाराज मला
बोलावले' तात्या पवारला म्हणाले, तुला डाकीण बघायची आहे ना? ही बघ
आली. धर तिचे केस’! पवार खरे तर सैन्यातtन
निवृत्त झालेलॆ साहसी. पण तेही
हादरून गेले! कोरड्यापात्रातून ही ओलेती होऊन आली कशी? असे वाटून खूप घाबरले. ‘नको, नको, बास बास’ म्हणून दरदरून आलेला घाम पुसला. तात्याने तिला परत जाण्यास आज्ञा केली. ती पुलाखाली गेली.
त्याच वेळी पुलावर येणार्या एका मोटारीचा प्रकाश पुलावर पडला. त्या प्रकाशात
पवारांनी तिचा पाठलाग केला. पण
त्यांना ती कोठेही दिसली नाही. श्री पवार नंतर मोशी जिल्हा अमरावती येथे
असताना निधन पावले. त्यांनी स्वतः सांगितलेला
अनुभव ...
10) श्री यादवेंद्र काजळे यांना
डाकिणीपासून अलिप्त ठेवले.
भारतीय वायुसेनेत कार्यरत असलेले व तात्याचे जिवलग शिष्य श्री.काजळे एकदा बरोबर प्रवास करत होते. सुटीवरुन येताना थेट जालना गाडी मिळाली नाही म्हणून सिल्लोड येथे रात्रीचा मुक्काम स्टँडवर करावा लागला. त्याकाळी स्टँडवर प्रकाशाची जास्त सोय़ नव्हती. कानपुरहून प्रवास करत आलेले. रात्र खूप झाली होती. एक ब्लँकेट टाकून तात्या पहुडला होता व काजळे पाय दाबत होते. त्या रात्रीत एक सुस्वरूप तरुणी दहा फूट अंतरावर आली. व काजळेकडे अंगविक्षेप करून बाहेर एकांतात येण्यासाठी खुणा करू लागली. अंथरुणाचेजवळ तिला येता येत नव्हते. तात्याला दुसऱ्या दिवशी त्यांनी विचारले कोण असावी ती बाई? तात्या म्हणाला, ‘अरे ती डाकीण होती! काजळे, तू अंथरुणाबाहेर गेला नाहीस म्हणून वाचलास! हा अनुभव प्रत्यक्ष श्री यादवेंद्र काजळेनी सांगितला आहे. हे काजळे हवाईदलातून निवृत्त होऊन सध्या वानप्रस्थाश्रमात जीवन व्यतीत करत आहेत. मध्यंतरी तात्याला अपघात झाल्यावर ते अचानक दत्त म्हणून पुण्यात हजर झाले! काही दिवस तात्याच्या आजारपणात त्याची शारीरिक सेवा केली. बरे झाले असे दिसताच ते एके दिवशी पुन्हा गावी गेले. तात्याच्या सानिध्यात सर्वांत जास्त काळ राहिलेले व संसारात रमवाण न होता एक विशिष्ट ध्येय लक्षात ठेऊन गुरू आज्ञा प्रमाण मानणारे एक आदर्श शिष्य असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे ....
11) उपजत ज्योतिष विद्या
देउळ गावराजा गावात आमचे वडील माधवराव जोशी (चितळे ) गावपाटील होते व श्री माधवराव कुळकर्णी (तलाठी) होते. त्यामुळे आमचे खूप घरोब्याचे संबंध होते. सर्वजण त्यांना पांडेबुवा म्हणायचे वयाची 100 वर्षे पुर्ण करून त्यांचे निधन झाले. ते उत्तम ज्योतिष सांगायचे. दरवर्षी माझा तात्या दसरासणा निमित्त घरी अकस्मात यायचा. एकवर्षी दसर्याचे जेवण झाले तरी पण आला नाही म्हणून वडिलांनी त्यांना प्रश्न केला. 'धनु का आला नाही?' ते उत्तरले, 'आगगाडीच्या डब्यात आग लागल्याने उशीर होत आहे'. ते विधान नंतर तंतोतंत खरे ठरले. मात्र तात्याने कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता पत्रिका वाचन व विष्लेषण प्रत्येक गोष्टीत करून दाखवत अचुक भाकितांचा अनुभव येतो. सद्यस्थितीत पत्रिका तोंडी मांडणे, कोणता ग्रह कोठे कसा कार्यरत आहे हे सांगणे हे तात्याचे वैशिठ्य आहे. केवळ गुरू कृपेने, कोणत्याही प्रकारचा अभ्यास ऩ करता फलित सांगणे केवळ अशक्य. मी त्याला विचारे, हे कसे शक्य झाले? तेंव्हा त्यानी एकदा उत्तर दिले की मी पुर्वजन्मी देवगिरीच्या किल्ल्यातील बाणभट्टाचा अवतार आहे. त्यांचेच अभ्यास कार्य कामी येते. मी लहानपणापासून त्याचे बरोबर आहे पण मला त्याच्यातील अगाध शक्तीचा शोध घेता आलेला नाही.....!

Friday, 4 January 2013
भाग 1... चितळे बाबांचे धाकटे बंधू श्री. अशोक सांगतायत बाबांच्या लहानपणीच्या अदभूत अठवणी!
भाग 1 ... चितळे बाबांचे धाकटे बंधू - श्री. अशोक सांगतायत बाबांच्या लहानपणीच्या अदभूत आठवणी
विदर्भात मोठ्या भावाला तात्या म्हणतात. मी लहानपणापासून भावाला तात्याच म्हणतो व मलाही तसाच प्रतिसाद मिळत आहे. आमच्या प्रदेशात पाठच्या भावाला 'पाठ फोडून आलेला' म्हणतात. त्याप्रमाणे प्रत्येक प्रसंगी तात्या माझे पाठीमागे कायम उभा असतो.
काही अभूतपूर्व अनुभव
मला आठवतय मी काहीतरी 5वी किंवा 6वीत असेन.आमच्या गल्लीत आम्ही पाटलाची पोर! त्यामुळे सडकेवरच्या मुलात व आम्हांत कधीच जमत नसे. काहीतरी कारण काढून एकदा माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यामुळे मुले मारू लागली. मी एकटा त्यांना प्रतिकार करू शकलो नाही. तेवढ्यात कोणीतरी म्हणालं, 'पाटलाचा धनु दवाखान्याच्या बाजूने येत आहे!पळा!' तात्यास ही सर्व परिस्थिती लक्षात आली. एकट्याने नऊ जणांना झोपवले! एक प्रमोद गुप्ता म्हणून होता, त्याची पाठ अक्षरश: फोडून काढली!
वक्तृत्व
1. संभाषणामधे ते अजूनही कोणास पुढे जाऊन देत नाहीत. शाळेत स्वयंस्फूर्त भाषणे आयोजित केली जात.समोरील चिठ्ठी उचलून त्यावरील विषयावर भाषण करावयाचे असे. प्रत्येक बक्षीस समारंभात वक्तृत्व स्पर्धेत क्र.1चे बक्षिस म्हणजे "एकनाथ चितळे" हे हमखास ठरलेले! गावातील प्रतिष्ठित व वक्ते श्री आबासाहेब बक्षी म्हणायचे, 'हे क्षात्र तेज आहे परशुरामाचे! ह्याचे वाटेल चुकूनही जाऊ नका".
2. आमचे वडील खूप आजारी होते. त्यांना बाजेवर उठून बसता सुद्धा येत नव्हते. तात्या सुट्टावर घरी आला होता. आई म्हणाली, 'अरे धनू, ह्यांची तब्बेतीस काय झाले कळत नाही. डॉ चे औषधाने फारसा गुण वाटत नाही.' त्याला काय वाटले कोणास ठाऊक. रात्री बाहेर अक्षता घेऊन महाराजांचे स्मरण करून माझे वडिलावर कोणी भानामतीचा प्रयोग केला असेल त्याची विद्या जळून जाईल'. असे म्हणून अक्षता आकाशात फेकू लागला. एकाएकी वडील बाजेवर उठत पद्मासन घालून बसले! 3-3 फूट त्याच अवस्थेत वर-खाली होऊन, "बोल, क्यूं बुलाया? " असे सारखे विचारू लागले. "अब कुछ नही होगा. फिक्र मत करो" असे म्हणाले. तेव्हा वडील नंतर ठीक! हे कसं झालं कळलं नाही!
पुढे चालू....
।।श्री ।।
माझा तात्याविदर्भात मोठ्या भावाला तात्या म्हणतात. मी लहानपणापासून भावाला तात्याच म्हणतो व मलाही तसाच प्रतिसाद मिळत आहे. आमच्या प्रदेशात पाठच्या भावाला 'पाठ फोडून आलेला' म्हणतात. त्याप्रमाणे प्रत्येक प्रसंगी तात्या माझे पाठीमागे कायम उभा असतो.
काही अभूतपूर्व अनुभव
मला आठवतय मी काहीतरी 5वी किंवा 6वीत असेन.आमच्या गल्लीत आम्ही पाटलाची पोर! त्यामुळे सडकेवरच्या मुलात व आम्हांत कधीच जमत नसे. काहीतरी कारण काढून एकदा माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यामुळे मुले मारू लागली. मी एकटा त्यांना प्रतिकार करू शकलो नाही. तेवढ्यात कोणीतरी म्हणालं, 'पाटलाचा धनु दवाखान्याच्या बाजूने येत आहे!पळा!' तात्यास ही सर्व परिस्थिती लक्षात आली. एकट्याने नऊ जणांना झोपवले! एक प्रमोद गुप्ता म्हणून होता, त्याची पाठ अक्षरश: फोडून काढली!
वक्तृत्व
1. संभाषणामधे ते अजूनही कोणास पुढे जाऊन देत नाहीत. शाळेत स्वयंस्फूर्त भाषणे आयोजित केली जात.समोरील चिठ्ठी उचलून त्यावरील विषयावर भाषण करावयाचे असे. प्रत्येक बक्षीस समारंभात वक्तृत्व स्पर्धेत क्र.1चे बक्षिस म्हणजे "एकनाथ चितळे" हे हमखास ठरलेले! गावातील प्रतिष्ठित व वक्ते श्री आबासाहेब बक्षी म्हणायचे, 'हे क्षात्र तेज आहे परशुरामाचे! ह्याचे वाटेल चुकूनही जाऊ नका".
2. आमचे वडील खूप आजारी होते. त्यांना बाजेवर उठून बसता सुद्धा येत नव्हते. तात्या सुट्टावर घरी आला होता. आई म्हणाली, 'अरे धनू, ह्यांची तब्बेतीस काय झाले कळत नाही. डॉ चे औषधाने फारसा गुण वाटत नाही.' त्याला काय वाटले कोणास ठाऊक. रात्री बाहेर अक्षता घेऊन महाराजांचे स्मरण करून माझे वडिलावर कोणी भानामतीचा प्रयोग केला असेल त्याची विद्या जळून जाईल'. असे म्हणून अक्षता आकाशात फेकू लागला. एकाएकी वडील बाजेवर उठत पद्मासन घालून बसले! 3-3 फूट त्याच अवस्थेत वर-खाली होऊन, "बोल, क्यूं बुलाया? " असे सारखे विचारू लागले. "अब कुछ नही होगा. फिक्र मत करो" असे म्हणाले. तेव्हा वडील नंतर ठीक! हे कसं झालं कळलं नाही!
पुढे चालू....
Wednesday, 7 March 2012
चितळेबाबांच्या घरच्या पुजा रुममधे बाबा सांगतात जालंधरबंध कसा घालावा याचे प्रात्यक्षिक मिलिंद चौबळ यांनी करताना नाथांची मुर्ती
चितळेबाबांच्या घरच्या पुजा रुममधे बाबा सांगतात जालंधरबंध कसा घालावा याचे
प्रात्यक्षिक मिलिंद चौबळ यांनी करताना
चितळेबाबांच्या घरच्या पुजा रुममधील बाबा जालंधर नाथांची मुर्ती
चितळेबाबांच्या घरच्या पुजा रुममधील बाबा जालंधर नाथांची तेजस्वी मुर्तीचे दर्शन
Subscribe to:
Posts (Atom)